शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

निवडणूक निकाल धक्कादायक नाहीत

By admin | Published: March 13, 2017 12:58 AM

पाच राज्यांमधील निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच एक्झिट पोलने त्याचे दिशानिर्देशन केले होते.

निवडणूक विश्लेषणअवधेश कुमार

पाच राज्यांमधील निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच एक्झिट पोलने त्याचे दिशानिर्देशन केले होते. जे लोक वास्तविक परिस्थिती समजून न घेता आपल्या राजकीय विचारांनुसार आकलन करीत होते, त्यांनाच या निवडणूक निकालांमुळे आश्चर्याचा धक्का बसला असेल. देशातील सर्वांत मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला अभूतपूर्व विजय मिळाल्यामुळे बहुतांश लोक चकित झाले आहेत. परिवार आणि पक्षातील अंतर्गत कलह तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळलेल्या राज्यातील सरकारला दुसरा पर्याय उपलब्ध असलेली जनता दुसऱ्यांदा सत्ता का बरे सोपविणार, याचा जराही विचार हे लोक करीत नाहीत. सत्तेत असताना नेते नेहमीच आपली क्षमता आणि लोकप्रियतेचे आवश्यकतेपेक्षा जास्त आकलन करीत असतात आणि त्यांच्या सभोवतालचे लोक त्यांना आणखी हरभऱ्याच्या झाडावर चढविण्याची भूमिका बजावतात.अखिलेश यादव यांच्यासोबत नेमके असेच घडले. त्यांचे सर्वांत मोठे सल्लागार रामगोपाल यादव यांनी त्यांना ‘पंतप्रधानपदाची लायकी असलेले’ नेते म्हणण्यापर्यंत मजल मारली. निवडणुकीत जय-पराजय होतच राहतो. परंतु अखिलेश यादव यांनी ज्या प्रकारे संपूर्ण पक्षाला आपल्या एकछत्री अंमलाखाली आणले आणि स्वत: व पत्नी डिम्पल यादव यांना मुख्य प्रचारक बनविले, त्यावरून या दोघांचीच लोकप्रियता जास्त असल्याने आपल्याला विजयासाठी इतरांची गरजच नाही, असा भ्रम त्यांना झाला होता, असे दिसते. याबाबतीत त्यांनी आपल्या पित्यालाही निवडणूक प्रचारापासून वानप्रस्थ घेण्यास भाग पाडले.काँग्रेससोबत समाजवादी पार्टीची युती करण्यामागे कोणताही तार्किक आधार नव्हता. या युतीमुळे मुस्लीम मतांचे विभाजन टाळता येईल, असा विचार करणे चुकीचे होते. कारण काँग्रेस गेल्या २८ वर्षांपासून आपला जनाधार मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहे. मुस्लीम काँग्रेससोबत असते तर २००७ व २०१२ मध्ये काँग्रेसची दुर्दशा झाली नसती. अशा परिस्थितीत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात सपाचा विजय झाला असता तर आश्चर्य वाटले असते.लोकांना सपाला विजयी करायचे नव्हते तर त्यांच्याकडे दोन पर्याय होते, ते म्हणजे भाजपा किंवा बसपा. लोकांनी बसपाचे सरकार २००७ ते २०१२ पर्यंत पाहिले आहे. या बसपाच्या शासनकाळात असे काहीही घडले नाही की ज्यामुळे लोकांना बसपाचे आकर्षण वाटावे. दुसरीकडे भाजपा होती, जिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात परिवर्तनाचा नारा दिला आणि हा नारा लोकांना भावला. उत्तर प्रदेश्जवळ सर्वकाही आहे, पण चांगले सरकार नाही, असे मोदी सांगत तेव्हा लोकांना ते पटत असे. त्यामुळे एक मानसशास्त्रीय स्थिती निर्माण झाली. तसेही १८ ते ३० वर्षांच्या युवकांनी केंद्रातील भाजपा सरकारचे काम पाहिले आहे.लोकांना परिवर्तन करायचे होते तर त्यांना बसपापेक्षा भाजपा चांगला पर्याय वाटला. त्यावरून लोकांचा मोदींवरील विश्वास कायम आहे आणि त्यांची लोकप्रियताही कायम आहे हे सिद्ध झाले.