ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाला मिळालेल्या दमदार विजयामुळे एकीकडे भाजपा नेते विजय साजरा करत असताना विरोधी पक्ष मात्र पुर्णपणे खचलेले दिसत आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याने भाजपा सत्ता स्थापन करणार हे आता नक्की झालं आहे. पंजाबमधील निकाल आम आदमी पक्षासाठी खूपच धक्कादायक ठरला आहे. निवडणुकीआधी पंजाबमध्ये भाजपाचा विजय होईल असा विश्वास आम आदमी पक्षाने व्यक्त केला होता.
कुमार विश्वास यांनी मान्य केला पराभव -
मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाने निकालाआधी सर्व उमेदवारांचे फोटो काढून मीडिया हाऊसेसना पाठवली होती. कुमार विश्वास यांना आम आदमी पक्षाच्या विजयाची पुर्ण खात्री होती. पण ज्याप्रमाणे निकाल हाती येऊ लागले त्यानंतर कुमार विश्वास यांचा विश्वास कमी होऊ लागला. पंजाबमध्ये आपला पराभव होत असल्याचं लक्षात आल्यानंतर कुमार विश्वास यांनी पराभव मान्य करणारी एक कविता ट्विट केली होती. पण थोड्याच वेळाने त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लादेखील भाजपाचं प्रदर्शन पाहून आश्चर्यचकित झाल्याचं दिसून आलं. त्यांनी ट्विट करत सांगितलं की ,'जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर विरोधी पक्षांना 2019 नाही तर 2024 ची तयारी करायला हवी. यावेळी भारतात विरोधी पक्षांमध्ये असा एकही नेता नाही जो 2019 मध्ये मोदी आणि भाजपाशी टक्कर घेऊ शकेल.
At this rate we might as well forget 2019 & start planning/hoping for 2024.— Omar Abdullah (@abdullah_omar) March 11, 2017