Election Results 2023 Live Updates : छिंदवाडामधून कमलनाथ पिछाडीवर, तर बुधनीमधून शिवराज सिंह चौहान आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:01 AM2023-12-03T10:01:43+5:302023-12-03T10:10:30+5:30

मध्य प्रदेशातील २३०, राजस्थानमध्ये १९९, छत्तीसगडमध्ये ९० आणि तेलंगणातील ११९ जागांसाठी निवडणूक झाली असून, या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.

Election Results Live Updates : Rajasthan, Telangana, Madhya Pradesh, Chhattisgarh; BJP, Congress In Close Fight kamal nath and shivraj KCR sachin pilot | Election Results 2023 Live Updates : छिंदवाडामधून कमलनाथ पिछाडीवर, तर बुधनीमधून शिवराज सिंह चौहान आघाडीवर

Election Results 2023 Live Updates : छिंदवाडामधून कमलनाथ पिछाडीवर, तर बुधनीमधून शिवराज सिंह चौहान आघाडीवर

देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मिझोराम वगळता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशातील २३०, राजस्थानमध्ये १९९, छत्तीसगडमध्ये ९० आणि तेलंगणातील ११९ जागांसाठी निवडणूक झाली असून, या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर केला नसला तरी दोन्ही पक्षातील अनेक दावेदार निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावण्यासाठी उतरले आहेत. 

(मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!)

अशा परिस्थितीत लोकांच्या नजरा या जागांवर लागल्या होत्या. जे नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक सरदारपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे दुसरे सर्वात मोठे दावेदार सचिन पायलट हे टोंक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तसेच, छत्तीसगडमध्ये सीएम भूपेश बघेल रिंगणात आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये सीएम शिवराज सिंह चौहान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यावेळी विधानसभेच्या दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत आणि यावेळी त्यांच्यासमोर दोन्ही जागांवर आव्हान आहे.

छत्तीसगडमधून मुख्यमंत्री भूपेश आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर छिंदवाडा विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ पिछाडीवर आहेत, भाजपचे विवेक बंटी साहू आघाडीवर आहेत, सुरुवातीच्या कलामध्ये कमलनाथ पुढे होते, पण आता ते पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, राज्यस्थानमधील टोंक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते सचिन पायलट सुरुवातीच्या कलामध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

याचबरोबर, ९ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये काँग्रेस ५० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाने ४४ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुजन समाज पार्टी २ ठिकाणी आघाडीवर असून ४ जागांवर अपक्ष उमेदवार पुढे आहे. मध्य प्रदेशमधील सुरुवातीचे कल पाहिल्यास भाजपाने ४६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ३७ जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष उमेदवार सध्या ४ ठिकाणी सुरुवातीच्या कलानुसार पुढे असल्याचे दिसून येत आहे. 
 

Web Title: Election Results Live Updates : Rajasthan, Telangana, Madhya Pradesh, Chhattisgarh; BJP, Congress In Close Fight kamal nath and shivraj KCR sachin pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.