शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

2019च्या निवडणुकीत मोदी-शाह जोडगोळीविरुद्ध 20 पक्ष, सोनिया गांधींची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 7:13 PM

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीत मोदी आणि शाहा या जोडगोळीविरोधात 20 पक्ष अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली -  भाजपाची देशभरात सुरू असलेली घोडदौड रोखण्यासाठी आता विरोधी पक्षांची एकजूट होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या मेजवानीस शरद पवार, शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता विरोधी पक्षांमध्ये एकजूट झाल्यास 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीत मोदी आणि शाहा या जोडगोळीविरोधात 20 पक्ष अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. काल झालेल्या बैठकीला काँग्रेससह 20 पक्षांचा समावेश होता. 

विविध गटांत विभागलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांनी काल दिल्लीती निवासस्थानी मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल काँन्फ्रन्सचे ओमर अब्दुल्ला, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी, सपाचे रामगोपाल यादव यांच्यासह  प्रादेशिक पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना भोजनासाठी निमंत्रित केले  होते. 

2019 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांना मजबूतपणे उभं करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. विरोधकांनी एकत्र येत लढल्यास मोदी लाट रोखता येईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. 16, 17 आणि 18 मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो.

तिसरी आघाडीसाठीही प्रयत्न -

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय स्तरावर बिगरभाजप, बिगरकाँग्रेस आघाडी बांधण्याच्या प्रयत्नांना तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी त्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी जवळीक वाढवताना दिसत आहेत. काँग्रेसचे राज्यसभेचे पश्चिम बंगालमधील उमेदवारअभिषेक मनु संघवी यांना ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला असला तरी बंगालमध्ये तृणमूल व काँग्रेस एकत्र आल्यास तिथे भाजपाला विरोधी पक्ष म्हणून विस्ताराची संधी मिळेल, हे ममता बॅनर्जी ओळखून आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपविरोधात काँग्रेसला सरसकट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला नाही. डाव्यांना बंगालमध्ये एकाकी पाडणे हा ममतांचा हेतू आहे. पण भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरणही करायचे आहे.  

उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधात समाजवादी पार्टी व बसपा जवळ येत असतानाच, तेलगू देशमच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तेलगू देशम, शिवसेना, एलजेपी, आरएलएसपी हे मित्रपक्षही भाजपसोबत राजकीय सौदेबाजी करावी की रालोआला सोडचिठ्ठी द्यावी, यासाठी संधीची वाट पहात आहेत. 

पण काँग्रेससोबत जाण्याविषयी बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, आप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, जनता दल (सेक्युलर), तेलगू देशम पार्टी व व्हायएसआर काँग्रेस यांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स हेच काँग्रेससमवेत आहेत. द्रमुक व अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलही कधी कुठे जातील, हे सांगणे अवघड आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवार