शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

Elections 2022: विधानसभा निवडणूक प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 4:24 PM

Elections 2022 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासोबतच, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदारसंघात जास्तीत जास्त 1000 लोकांच्या सार्वजनिक सभांना परवानगी दिली आणि घरोघरी प्रचारासाठीचे नियमही शिथिल केले आहेत.

एका निवेदनात आयोगाने म्हटले आहे की, घरोघरी जाणाऱ्या प्रचारात (Door To Door Campaign) सुरक्षा कर्मचार्‍यांना वगळून आता 10 जणांऐवजी 20 लोक सहभागी होऊ शकतील, तर इनडोअर प्रचार सभांसाठी लोकांची क्षमताही 300 वरून 500 पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना निर्बंधांसह नियुक्त मोकळ्या जागांवर प्रचारासाठी व्हिडिओ व्हॅनलाही परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना 15 जानेवारीपर्यंत प्रचार सभा, रोड शो आणि बाईक रॅली आणि अशा इतर प्रचार कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. 15 जानेवारी रोजी आयोगाने हे निर्बंध 22 जानेवारीपर्यंत आणि नंतर 31 जानेवारीपर्यंत वाढवले होते.

यूपीमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदानउत्तर प्रदेशमध्ये पहिल्या दोन टप्प्यात 10 आणि 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर पंजाबमधील सर्व 117 विधानसभा जागांसाठी 20 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पाचही राज्यांतील मतदान पूर्ण झाल्यानंतर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२