नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) गुरुवारी दिल्ली विद्यापीठविद्यार्थी संघटनेच्या (डुसू) निवडणुकीत अध्यक्षपदासह तीन जागा जिंकल्या. काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंटस युनियन आॅफ इंडियाने (एनएसयुआय) अवघी एक जागा जिंकली.अभाविपचे अंकीव बसोया यांनी १७४४ मते घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. भाजपचेच शक्ती सिंह हे ७६७३ मते मिळवून उपाध्यक्षपदी निवडले गेले. एनएसयुआयचे आकाश चौधरी यांनी सचिवपद जिंकले तर अभाविपच्या ज्योती सहसचिवपदी निवडून आल्या. बसोया यांनी २०४६७ मते मिळवली तर एनएसयुआयचे सनी छिल्लर यांना १८७२३ मते मिळाली. आकाश सिंह २३०४६ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी एनएसयुआयच्या लीना यांना १५३७३ मते मिळाली.चौधरी यांनी ही निवडणूक न्याय वातावरणात झालेली नसून सात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमधील डाटा बेपत्ता आहे, असा आरोप केला. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने गुरुवारी या निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम्स या निवडणूक आयोगाने दिलेल्या नसून त्या खासगी पातळीवर उपलब्ध करूनघेण्यात आल्याचे दिसते, असे स्पष्टीकरण केले....तर आणखी जागा जिंकल्या असत्यादिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी या निवडणुकीत एनएसयुआयने चांगली कामगिरी केली असे सांगून ईव्हीएम्समध्ये गडबड केली गेली नसती तर आणखी जास्त जागा जिंकल्या असता असा दावा केला. तत्पूर्वी, आपचे निमंत्रक (दिल्ली) गोपाल राय यांनीही ईव्हीएम्समध्ये गडबडी केली गेल्याचा आरोप केला. ईव्हीएम्स जर डुसुच्या निवडणुका न्याय पद्धतीने घेऊ शकत नाहीत तर निवडणूक आयोग देशात न्याय वातावरणात त्या कशा घेऊ शकेल, असे म्हटले.
डुसूच्या निवडणुकीत अभाविपला तीन जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 2:50 AM