२०२२-२३मध्ये पुन्हा ११ राज्यांत निवडणुका; निवडणुका जिंकण्याचे मोदींचे मिशन, अशी आहे योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 10:54 AM2022-11-23T10:54:10+5:302022-11-23T10:57:18+5:30

पक्षाच्या कोअर ग्रुपची बैठक या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आली होती व त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना इतर ९ राज्यांतील निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागण्यास सांगितले आहे.

Elections in 11 states in 2022-23; Modi's Mission to Win Elections | २०२२-२३मध्ये पुन्हा ११ राज्यांत निवडणुका; निवडणुका जिंकण्याचे मोदींचे मिशन, अशी आहे योजना

२०२२-२३मध्ये पुन्हा ११ राज्यांत निवडणुका; निवडणुका जिंकण्याचे मोदींचे मिशन, अशी आहे योजना

Next

हरिश गुप्ता

नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निकालाची वाट न पाहता भाजप नेतृत्वाने २०२४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत होणाऱ्या इतर ९ राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या यंत्रणेला सज्ज केले आहे. हिमाचलात विधानसभा निवडणुका १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आल्या होत्या.

पक्षाच्या कोअर ग्रुपची बैठक या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आली होती व त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना इतर ९ राज्यांतील निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागण्यास सांगितले आहे.

मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्यात येतील, असेही त्यावेळी ठरविण्यात आले. निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांमध्ये पक्षाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले आहेत. या राज्यांत भाजप जिंकल्यास राज्यसभेतही पक्षाचे संख्याबळ वाढणार आहे. गुजरात निवडणूक जिंकल्यास भाजपला आणखी बळ मिळेल, असे बोलले जात आहे.

राज्यनिहाय स्थिती -
- फेब्रुवारी २०२३मध्ये त्रिपुरा, मेघालय व नागालँडमध्ये तर मे २०२३मध्ये कर्नाटकात निवडणुका होतील.
- त्रिपुरात भाजपची सत्ता आहे तर नागालँडमध्ये मुख्यमंत्री नेफियु रिओ (एनडीडीपी) हे भाजपच्या मित्रपक्षाचे आहेत. 
- मेघालयात मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्या पक्षाने एनडीए सोडल्याने भाजपला धक्का बसलेला आहे.
- नोव्हेंबर-डिसेंबर २०२३मध्ये छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांत निवडणुका होत आहेत.
- छत्तीसगढ, राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे आणि तेलंगणात टीआरएसचे के. चंद्रशेखर राव सत्ताधारी आहेत. 
- मे २०२४मधील लोकसभा निवडणुकीबरोबर आंध्रप्रदेश (वायएसआर-काँग्रेस), अरुणाचल प्रदेश (भाजप), ओडिशा (बिजद) व सिक्कीममध्ये (एसकेएम-एनडीए) विधानसभा निवडणुका होत आहेत. 

Web Title: Elections in 11 states in 2022-23; Modi's Mission to Win Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.