शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'सत्ताधारी पक्षाला पाच राज्यांतील निवडणुका जड'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 3:57 AM

राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे अटीतटीची लढत होईल. तेलंगणामध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल, असे भाकीत राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केले.

पुणे : आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला संघर्ष करावा लागेल. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. भाजपाला सत्तास्थापनेची पुन्हा संधी असून, इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल. पाच राज्यांतील निवडणुका सत्ताधारी पक्षाला जड जातील. राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे अटीतटीची लढत होईल. तेलंगणामध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल, असे भाकीत राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केले.‘गुरुकुल विश्वपीठ’ आयोजित अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री, ज्योतिष अभ्यासक प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते झाले. संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अजयचंद्र भागवत (गुरुजी), राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर, विजय जकातदार, चंद्रकांत शेवाळे, डॉ. मधुसूदन घाणेकर, पल्लवी भागवत उपस्थित होते. मारटकर म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर घेतल्या, तर युतीला लाभ मिळेल, त्या घेण्यास उशीर झाल्यास त्यांना विजय मिळविणे कठीण जाईल.मोडक म्हणाल्या, ‘ज्योतिष हे क्रियाशील अध्यात्म आहे. ज्योतिष हे माणसाला हताश करण्यासाठी नाही, तर प्रेरणा देण्यासाठी आहे. काळाच्या उदरात दडलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषी करतो. संकट कळाले तरी त्यातून सावरण्याची ताकद अध्यात्मातून मिळते.’ ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट, नंदकिशोर जकातदार, डॉ. मधुसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे, डॉ . श्रीहृदय भागवत, रजनी साबदे या मान्यवरांनी विविध व्याख्यान सत्रात मार्गदर्शन केले.

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगडElectionनिवडणूकcongressकाँग्रेस