Electoral Bond Top Donors List: इलेक्टोरल बॉन्डची आकडेवारी सार्वजनिक झाली आहे. इलेक्टोरल बाँड्स विकत घेतलेल्या आणि देणग्या देणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत हे आता साऱ्यांनाच कळले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) ने इलेक्टोरल बाँड्सचा डेटा निवडणूक आयोगाला दिला आहे. निवडणूक आयोगाने (EC) देखील निवडणूक रोख्यांचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड केला आहे. यादी सार्वजनिक झाल्यानंतर, कोणत्या कंपन्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले आणि किती पैसे खर्च केले हे कळले. ५० कोटींहून अधिक किमतीचे इलेक्टोरल बाँड खरेदी करणाऱ्या कंपन्यांची यादीही मोठी असून त्यात एकूण २७ नावे आहेत. यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.
५० कोटींपेक्षा जास्त खर्च करणाऱ्या कंपन्यांची यादी
- फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्विसेस - १,३६८ कोटी रुपये
- मेघा इंजीनियरिंग एंड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड - ९६६ कोटी
- क्विक सप्लाय चेन प्राइव्हेट लिमिटेड - ४१० कोटी
- वेदांता लिमिटेड - ४०० कोटी
- हल्दिया एनर्जी लिमिटेड - ३७७ कोटी
- भारती ग्रुप - २४७ कोटी
- एस्सेल माइनिंग एंड इंडस्ट्रीज लिमिटेड - २२४ कोटी
- वेस्टर्न यूपी पावर ट्रांसमिशन - २२० कोटी
- केवेंटर फूडपार्क इन्फ्रा लिमिटेड - १९४ कोटी
- मदनलाल लिमिटेड - १८५ कोटी
- डीएलएफ ग्रुप - १७० कोटी
- यशोदा सुपर स्पेशियल्टी हॉस्पिटल - १६२ कोटी
- उत्कल एल्यूमिना इंटरनॅशनल - १४५.३ कोटी
- जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड - १२३ कोटी
- बिर्ला कार्बन इंडिया - १०५ कोटी
- रूंगटा सन्स - १०० कोटी
- डॉ रेड्डीज - ८० कोटी
- रश्मि सीमेंट लिमिटेड - ६३.५ कोटी
- श्री सिद्धार्थ इन्फ्राटेक अँड सर्विसेज आईपी - ६०.१ कोटी
- इनफिना फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड - ६० कोटी
- एनसीसी लिमिटेड - ६० कोटी
- पीरामल एंटरप्रायजेस ग्रुप - ६० कोटी
- NATCO फार्मा लिमिटेड - ५७.२५ कोटी
- DIVI S लॅबोरेटरी लिमिटेड - ५५ कोटी
- द रैमको सीमेंट लिमिडेट - ५४ कोटी
- नवयुग इंजीनियरिंग - ५५ कोटी
- यूनाइटेड फॉस्फरस इंडिया एलएलपी - ५० कोटी