शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

काँग्रेसच्या अधिवेशनासाठी बेळगाव नगरी सजली, शहरभर विद्युत रोषणाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:53 IST

ऐतिहासिक अधिवेशनाच्या शतक महोत्सवाची तयारी पूर्ण

बेळगाव : १९२४ साली बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा शताब्दी सोहळा बेळगाव येथे २६ व २७ डिसेंबर रोजी होत आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या शहरात करण्यात आली आहे. प्रमुख रस्ते आणि चौकांचे विद्युत रोषणाईने सुशोभीकरण करण्याबरोबरच रस्त्याशेजारील भिंतींवर आकर्षक रंगकाम केले आहे.कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन आणि महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा एकाच वेळी होत असल्यामुळे बेळगाव या सीमावर्तीय जिल्ह्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. या दोन कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहराला सजविले असून, सुवर्ण विधानसौधची इमारत रंगीबेरंगी दिव्यांनी न्हाऊन निघाली आहे.काँग्रेसचे शतकमहोत्सवी अधिवेशन २६ व २७ डिसेंबर रोजी बेळगावमध्ये होणार आहे. यानिमित्ताने काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सूरजेवाला आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे गेल्या दोन दिवसांपासून बेळगावमध्ये तळ ठोकून आहेत. २७ डिसेंबर रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते सुवर्ण सौधसमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

२६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या १९२४ च्या अधिवेशनाचे ठिकाण असलेल्या बेळगाव येथील वीर सौधच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करतील. २६ डिसेंबर रोजी वीर सौधमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. तर २७ डिसेंबर रोजी सीपीएड मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

१०० वर्षे पूर्ण२६ डिसेंबर १९२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनाला २६ डिसेंबर १९२४ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गांधी भारत’ या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcongressकाँग्रेस