गेल्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांना आग लागण्याच्या (Electric Vehicle Fires Incident) अनेक घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, आता या घटनांनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशा घटना दुर्देवी असून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळल्यास कंपन्यांना मोठा दंड ठोठावला जाईल असा इशाराही त्यांनी ट्वीटद्वारे दिला आहे.
अशा घटनांमध्ये सरकार तज्ज्ञ समितीचा अहवाल मिळाल्यानंतर आवश्यक ते आदेश जारी करेल. तसंच अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केल्याची माहिती नितीन गडकरी यांनी गुरूवारी दिली. इलेक्ट्रीक वाहनांशी निगडीत काही दुर्घटना गेल्या दोन महिन्यांमध्ये समोर आल्या आहेत. यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि काही जण जखमी झालेत हे अतिशय दुर्देवी आहे, असं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.