ऑनलाइन लोकमत
ईटाह, दि. १३ - उत्तरप्रदेशात राष्ट्रीय महामार्ग ९१वर मंगळवारी सकाळी उत्तरप्रदेश परिवहन सेवेच्या एका बसवर उच्च दाबाची विद्युत तार कोसळली. दिल्ली-कानपूर मार्गावर घडलेल्या या दुर्घटनेमध्ये ९ जण ठार झाले असून, १८ जण जखमी झाले आहेत. सकाळी १० च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
ईटाहवरुन ही बस बेवरच्या दिशेने जात असताना ३३ हजार केवी उच्च दाबाची विद्युत तार या बसवर कोसळली. विजेच्या धक्क्याने बसमधील नऊ जणांचा मृत्यू झाला तर, १८ जण जखमी झाले. तीन महिला, तीन पुरुष आणि एका मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. करंटमुळे बसमध्ये आगही लागली होती.
दुर्घटनेनंतर बसमधील प्रवाशांच्या किंकाळया ऐकून त्या मार्गावरुन जाणारे अन्य प्रवासी मदतीला धावले. त्यांनी आग विझवून अन्य प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दुर्घटनाग्रस्त बस बेवर डेपोमधून निघाली होती.
Etah (UP): 9 dead, over 18 injured after a high-tension live wire falls on a roadways bus near National highway pic.twitter.com/kZTqwCr8v8— ANI UP (@ANINewsUP) September 13, 2016