शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

Electricity Bill: केंद्राचा एक निर्णय अन् महाराष्ट्रात वीज बिल महागण्याची शक्यता; झटका देण्याची तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 1:05 PM

आधीच भरमसाठी वीज बिल येत असल्याने कितीही कमी वीज वापर केला तरी पाचशेच्या दोन चार नोटा खर्ची पडत आहेतच. त्यातच केंद्र सरकारचा एक निर्णय महाराष्ट्र, गुजरात, पंजाबमधील नागरिकांना वीज बिल दरवाढीचा शॉक देण्याची शक्यता आहे.

येत्या काही काळात वीज ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. आधीच भरमसाठी वीज बिल येत असल्याने कितीही कमी वीज वापर केला तरी पाचशेच्या दोन चार नोटा खर्ची पडत आहेतच. त्यातच केंद्र सरकारचा एक निर्णय महाराष्ट्र, गुजरात, पंजाबमधील नागरिकांना वीज बिल दरवाढीचा शॉक देण्याची शक्यता आहे. 

एनटीपीसीसह देशातील काही राज्यांना रेल्वे आणि समुद्र मार्गे कोळशाचा पुरवठा केला जावा, असा निर्णय काही काळापूर्वीच केंद्र सरकारने घेतला होता. म्हणजेच काही प्रमाणावर कोळसा हा रस्ते, रल्वे मार्गे तर काही प्रमाणावर कोळसा हा समुद्र मार्गे नेण्यात यावा असा हा निर्णय आहे. यामुळे या नव्या निर्णयामुळे वीज उत्पादन प्रकल्पांचा खर्च १० टक्क्यांनी वाढणार आहे. 

सीएनबीसीच्या वृत्तानुसार कोळशाच्या आवश्‍यकतेच्या एक पंचमांश भागाची वाहतूक जरी नव्या पद्धतीने झाली तरी वीज उत्पादनाचा खर्च वाढणार आहे. याचा थेट भार हा ग्राहकांवर टाकला जात असतो. यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत विजेचे बिल वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पंजाबला २०० कोटींचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. संपूर्ण कोळसा रेल्वे मार्गाने मिळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पंजाबने केली आहे.

उर्जा मंत्रालयाने गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब आणि NTPC यांना त्यांच्या कोळशाच्या गरजेपैकी काही भाग रेल्वे-शिप-रेल्वे मोडद्वारे वाहतूक करण्यास सांगितले आहे. या पद्धतीत खाणींतील कोळसा प्रथम रेल्वेच्या माध्यमातून जवळच्या बंदरात नेला जातो, त्यानंतर समुद्रमार्गे तो कोळसा ऊर्जा प्रकल्पाच्या जवळच्या बंदरात पोहोचतो. त्यानंतर तेथून कोळसा रेल्वेने वीज प्रकल्पात नेला जातो.

का घेतला असा महागडा निर्णय...कोळसा रेल्वे आणि रस्त्याने देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पाठवला जातो. रस्त्याने वाहतूक केल्यास अपघाताची भीती असते. तसेच प्रदूषणही होते. तसेच रस्ते अरुंद असल्याने देखील वाहतूक करण्यासाठी वेळ लागतो. यातून पर्याय काढण्यासाठी केंद्राने हा मार्ग स्वीकारला आहे. 

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण