चेन्नई : प्रत्येक राज्यातील विद्युत विभाग (Electricity Department) एक सारखेच असल्याचे दिसून येत आहे. आपल्या ग्राहकांना कधीही आणि कुठेही धक्का देईल, याबाबत सांगता येत नाही. तामिळनाडूमधून ताजे प्रकरण समोर आले आहे. येथील विद्युत विभागाने एका ग्राहकाला 25 हजार रुपयांचे वीज बिल (Electricity Bill) पाठवले आहे. विशेष म्हणजे, या ग्राहकाच्या घरात फक्त 3 बल्बचा वापर होतो.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक देवकी या निलगिरी भागातील मातमंगलम शहरात एका छोट्या घरात राहतात. नुकताच त्यांच्या मोबाईलवर विद्युत विभागाचा मेसेज आला. यामध्ये त्यांना 25 हजार रुपये वीज बिलाची रक्कम भरण्यास सांगण्यात आले. हे बिल पाहून त्यांना आश्चर्य वाटले, कारण विजेच्या वापराच्या (Electricity Consumption) नावाखाली घरात काही तास फक्त 3 बल्बचा वापर केला जातो.
देवकी यांनी आपली तक्रार घेऊन जवळचे विद्युत विभागाचे कार्यालय गाठल्याचे सांगण्यात येते. मात्र तेथून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, हे माहित असले पाहिजे की अशा प्रकारच्या समस्येचा सामना करणारी ती एकमेव नाही. इतर लोकही वापरापेक्षा जास्त वीज बिल (Heavy Electricity Bill) आकारल्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्या सर्वांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान, लोकांच्या तक्रारी आल्यानंतर विद्युत विभागाने प्राथमिक चौकशी केली. यामध्ये रमेश नावाचा विभागीय कर्मचारी काही काळापासून सातत्याने बिलांमध्ये छेडछाड करत असल्याचे दिसून आले. वीजेची बिले म्हणून मिळालेल्या रकमेचा त्यांनी गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशीत विद्युत विभागाने रमेशला निलंबित केले आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीही सुरू करण्यात आली आहे.