ऋषिराज तायडे
मुंबई : उत्तम भौगोलिक परिस्थिती आणि वर्षभर मुबलक सूर्यप्रकाशामुळे देशात एकूण गरजेच्या तिप्पट सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकते. परंतु देशातील निम्म्याहून अधिक लोक या पर्यावरणपूरक ऊर्जास्रोताबद्दल अनभिज्ञ आहे. देशात अधिकाधिक सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी नुकतीच पंतप्रधान सूर्यघर योजनेची घोषणा करण्यात आली. त्यातून एक कोटी घरांवर सोलार पॅनल बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
गरज २४० गिगावॉट, क्षमता ६३७ गिगावॉट
मुळात देशाची विजेची गरज ही २४० गिगावॉट आहे. परंतु देशातील एकूण २५ कोटी घरांवर सोलार पॅनल बसविल्यास वर्षभरात तब्बल ६३७ गिगावॉट ऊर्जानिर्मिती होऊ शकते.
सरसकट सर्वच घरांवर सोलार पॅनल बसविणे शक्य नसले, तरी किमान ११८ गिगावॉट सौर ऊर्जानिर्मिती तर निश्चितच करू शकतो.
केवळ ७३.३ गिगावॉट निर्मिती
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये १०० गिगावॉट सौर ऊर्जेची निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते.
परंतु पुरेशा जनजागृती अभावी मागील वर्षापर्यंत देशात केवळ ७३.३ गिगावॉट ऊर्जानिर्मिती सौर ऊर्जेच्या माध्यमातून होते. त्यापैकी २०% ऊर्जानिर्मिती निवासी प्रकल्पातून होते.
मोठा गुंतवणूक खर्च ही अडचण
सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी सुरुवातीला लागणारा मोठा खर्च तसेच त्याची देखभाल-दुरुस्ती कशी करावी, ही नागरिकामध्ये मोठी अडचण असल्याचे दिसते.
रुफटॉप सौर ऊर्जेतील टॉप १० राज्ये
राज्य ऊर्जाक्षमता
गुजरात २,८९८.१६
महाराष्ट्र १,७१६.३०
कर्नाटक १,५६२.११
राजस्थान १,००२.४४
केरळ ५१२.६७
हरयाणा ४८६.२३
तामिळनाडू ४४९.२२
तेलंगणा ३४३.७८
पंजाब २९८.९२
मध्य प्रदेश २९६.०२
शहरी माहिती आहे
४२%
माहिती नाही
५८%
ग्रामीण माहिती आहे
४८%
माहिती नाही
५२%