शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

हत्तींचे नंदनवन ओडिशा बनला मृत्यूचा सापळा; हस्तिदंतासाठी वाढती शिकार; दशकभरात ७९७ हत्तींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 5:54 AM

ओडिशामध्ये हस्तिदंतासाठी हत्तींना विजेच्या जिवंत तारेचा शॉक देऊन अथवा विष खाऊ घालून त्यांची शिकार करण्यात येते.

- अंबिकाप्रसाद कानुनगोलोकमत न्यूज नेटवर्कभुवनेश्वर : हत्तींचे नंदनवन म्हणून एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या ओडिशामध्ये हस्तिदंतासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जात आहे. पूर्व भारतातील ७४ टक्के हत्ती एकट्या ओडिशामध्ये होते; पण आता हे प्रमाण ३० टक्क्यांवर आले आहे. ओडिशामध्ये गेल्या दशकभराच्या कालावधीत ७९७ हत्तींचा मृत्यू झाला आहे. 

ओडिशामध्ये हस्तिदंतासाठी हत्तींना विजेच्या जिवंत तारेचा शॉक देऊन अथवा विष खाऊ घालून त्यांची शिकार करण्यात येते. त्या राज्याच्या वनखात्याने दिलेल्या माहितीनुसार शिकारी जंगलामध्ये विजेच्या जिवंत तारांचे जाळे विणतात. त्यात अडकलेले हत्ती विजेचा जोरदार धक्का लागून मरण पावतात. अशा रीतीने ४० हत्तींचा मृत्यू झाला आहे. रेल्वे किंवा रस्त्यावर वाहनांनी धडक दिल्याने आणखी ४० हत्ती मरण पावले. ३६९ हत्ती विहिरीत पडून, नैसर्गिक किंवा अन्य कारणांमुळे मरण पावले, तर १७० हत्तींचा मृत्यू अज्ञात कारणांनी झाल्याचे वन खात्याने सांगितले. दरवर्षी ओडिशामध्ये सुमारे १८ ते २० हत्ती मरण पावतात. 

गेल्या गुरुवारी सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात बकुआ गावाजवळ ८ डिसेंबर रोजी हत्तीची शिकार करण्यात आली. मात्र, या हत्तीचे अवशेष तीन वनाधिकाऱ्यांनी जाळून टाकल्याचा किंवा नदीत फेकून दिल्याचा आरोप झाला होता. त्या प्रकरणाची ओडिशा उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली. हत्तींची शिकार रोखण्यात ओडिशा सरकार अपयशी ठरले आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले 

हत्तींचे अधिवास होताहेत नष्ट ओडिशामध्ये वाढते शहरीकरण, खाणकाम, औद्योगिकीकरणामुळे वृक्षतोड होत असून, जंगलांचा आकार आक्रसला आहे व हत्तींचे अधिवास नष्ट होत चालले आहेत.

टॅग्स :forestजंगल