छत्तीसगडच्या दंतेवाडामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दंतेवाडामध्ये नक्षली हल्ल्यात १० जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात ११ जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेली माहिती अशी, छत्तीसगड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. या ठिकाणी नक्षलवादी मोठ्या प्रमाणात होते. यात त्यांच्या काही कमांडरचे पतकही होते, अशी माहिती मिळाली होता. दरम्यान, या माहितीवर पोलीस तिथे गेले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा वापर करुन स्फोट घडवून आणला. यात घातक स्फोटकांचा वापर केला होता अशी माहिती समोर आली आहे. या स्फोटात ११ जवान शहीद झाले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यामध्ये शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता चकमक उडाली होती. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी आपले साहित्य तिथेच टाकून जंगलात पळ काढला. ते साहित्य पोलीस पथकाने जप्त केले होते.
तेव्हा बोधीनटाेला जंगल परिसरात २० ते २५ नक्षलवादी जमले असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष अभियान पथकाचे जवान या भागात नक्षल विराेधी माेहीम राबवत हाेते. दरम्यान नक्षलवाद्यांनी पाेलिसांच्या दिशेने गाेळीबार केला. पाेलिसांनीही प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला होता.