गेल्या 47 वर्षात विधानसभेच्या स्थापनेपासून जिल्ह्यात 545 उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विधानसभेत जाण्याचे स्वप्न पाहिले. यातून अकरा उमेदवारांनी यात यश मिळविले. यात बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे, शिवाजी कर्डिले, तुकाराम गडाख आणि नवनीतभाई बार्शीकर यांचा समावेश आहे.
सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यंदा अनेक मतदारसंघात चौरंगी, पंचरंगी निवडणूक रंगणार आहे. तर अपक्षांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, अपक्षांची ही परंपरा आताची नसून जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत ती 1967 पासून आलेली आहे. त्यात 199क्च्या दशकात मोठी वाढ झाली. पक्षाने योग्य, लोकप्रिय, लायक उमेदवारांना ऐनवेळी पक्षाचे तिकीट नाकारल्याने इच्छुक निवडणुकीच्या आखाडय़ात अपक्ष उतरले होते.
जिल्ह्यात अपक्ष म्हणून निवडणूक लढवून अनेक दिग्गज विजयी झाल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे त्या काळात पक्षावर निष्ठा ठेवणा:या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात हे अपक्ष यशस्वी झालेले आहेत. जिल्ह्यातील मतदारसंघात अपक्षांची संख्या 1995 मध्ये सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. यात शेवगाव 2क्, नगर (उत्तर) आताचा नेवासा 17, नगर (दक्षिण) 18, श्रीरामपूर 1क्, राहुरी 12, कोपरगाव 11, कजर्त 9 अशी अपक्ष उमेदवारांची संख्या होती.
अपक्ष उमेदवारी करणो सोपे नाही. यासाठी स्वत:ची यंत्रणा आवश्यक आहे. मात्र, तरी देखील जिल्ह्यातील अकरा अपक्षांनी पहिल्याच प्रयत्नात अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकली आहे. तर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पराभूत केले आहे. यात निवडून आलेल्या काहींनी तर राज्याच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. यात बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे यांचा समावेश आहे. बबनराव पाचपुते यांनी 2क्क्4 मध्ये अपक्ष म्हणून तिस:यांदा निवडणूक लढविली
आणि त्यात विजयी झाले. त्यापूर्वी ते दोनदा जनता पक्षाकडून निवडून आलेले होते.
आजवर निवडणूक लढविलेल्या अपक्षांची संख्या
4नगर 62, कजर्त 48, श्रीगोंदा 39, नगर (उत्तर) आताचा नेवासा 46, पाथर्डी 38, शेवगाव 52, श्रीरामपूर 68, शिर्डी 36, कोपरगाव 29, राहुरी 35, पारनेर 34, संगमनेर 34, अकोले 24 यांचा समावेश आहे.
अपक्ष विजयी
4बाळासाहेब थोरात (1985, संगमनेर), प्रसाद तनपुरे (1985, राहुरी), शंकरराव कोल्हे (1972, कोपरगाव), बबनराव पाचपुते (2क्क्4, श्रीगोंदा), बी. एम. भारस्कर (1972, श्रीगोंदा), नवनीतभाई बार्शीकर (1972, नगर दक्षिण), शिवाजी कर्डिले दोनदा (1995, 1999 नगर उत्तर), बी.आर. म्हस्के (1972, पाथर्डी), तुकाराम गडाख (199क्, शेवगाव), एम. के .गाडे (1967, कोपरगाव).