शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

महागाईमुळे केंद्राविरोधात एल्गार, आजपासून दोन दिवसांचा संप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 6:54 AM

बँका, रेल्वे, ऊर्जा, संरक्षण यांसह अनेक क्षेत्रातील कामगारांचा सहभाग, वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा लागू

नवी दिल्ली : खासगीकरण तसेच कामगारविरोधी धोरण यांच्या निषेधार्थ देशभरातील कामगार संघटनांनी उद्या, सोमवारपासून केंद्र सरकारविरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात बँकांसह रेल्वे, संरक्षण, कोळसा, ऊर्जा, स्टील, तेल, दूरसंचार, टपाल, प्राप्तिकर विभाग, तांबे, विमा क्षेत्रातील कामगार संघटना सहभागी होणार असल्याने बँकेतील व्यवहारांसह वाहतूक, रेल्वे आणि वीजपुरवठा या सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांसाठी संपकाळात महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपासून संपाला सुरुवात होईल आणि ३० मार्चच्या सकाळी सहापर्यंत संप सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.   

सरकारी व खासगी बँका संपात सहभागीबँकिंग क्षेत्रातील कर्मचारीही या संपात सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने स्पष्ट केले आहे. संपात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सहभागी होणार असल्याने बँक व्यवहार ठप्प होणार आहेत. एसबीआयसह काही बँकांनी कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था केल्याचा दावा केला आहे. 

एटीएममध्ये खडखडाट?संपाच्या काळात बँकांचे ऑनलाइन व्यवहार सुरू राहणार आहेत. मात्र, शनिवार-रविवारच्या सुटीला लागून संप असल्याने सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. परिणामी एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो.

मागण्या नेमक्या काय?nकामगार कायद्यांमधील प्रस्तावित बदल रद्द करणेnकोणत्याही स्वरूपाचे खासगीकरण न करणेnराष्ट्रीय चलनीकरण वाहिनी (नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइन) रद्द करणेnमनरेगा अंतर्गत मजुरीचे वाढीव वाटप करणेnकंत्राटी कामगारांचे नियमितीकरणnजुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणेnबँकांना बळकट करावेnबुडीत कर्जाची जलद वसुली करावीnग्राहकांवरील सेवा शुल्क कमी करावे

संपात सहभागी कामगार संघटना 

nइंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक),हिंद मजदूर सभा, सिटू, आययुटक, टीयूसीसी, सेल्फ एम्प्लॉईज विमेन्स असोसिएशन (सेवा),लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन (एलपीएफ), युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस (यूटीयूसी).nरेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील युनियन अनेक ठिकाणी संपाच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात एकत्र येतील, असे संयुक्त मंचाने निवेदनामध्ये म्हटले आहे. 

सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी २८ आणि २९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या संपादरम्यान देशभरातील २० कोटींहून अधिक कामगार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. - अमरजीत कौर, सरचिटणीस, ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा इशारा रस्ते, वाहतूक आणि वीज विभागाचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने देशातील वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाने रविवारी सर्व सरकारी यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा दिला असून २४ तास वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.

 

टॅग्स :StrikeसंपPetrolपेट्रोलInflationमहागाईGovernmentसरकार