अब्जाधीश उद्योगपती आणि इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. इलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेसोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) १०० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
इलॉन मस्क हे एक्सचे मालक आहेत. तसेच, या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले व्यक्ती देखील आहेत. इलॉन मस्क यांनी एक्सवर लिहिले आहे की,"सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन." दरम्यान, एक्सवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या लोकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सातव्या क्रमांकावर आहेत. तर इलॉन मस्क या यादीत शीर्षस्थानी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर १०० दशलक्ष म्हणजेच १० कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (३८.१ दशलक्ष फॉलोअर्स), दुबईचे शासक शेख मोहम्मद (११.२ दशलक्ष फॉलोअर्स) आणि पोप फ्रान्सिस (१८.५ दशलक्ष फॉलोअर्स) यांसारख्या जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप पुढे आहेत.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा जास्त आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे २६.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २७.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे १९.९ दशलक्ष फॉलोअर्स, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ७.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
नरेंद्र मोदींनी सेलिब्रिटींनाही टाकले मागे टेलर स्विफ्ट - ९५.३ दशलक्षलेडी गागा - ८३.१ दशलक्षकिम कार्दशियन -७५.२ दशलक्षविराट कोहली – ६४.१ दशलक्षनेमार जूनियर – ६३.६ दशलक्षलेब्रॉन जेम्स – ५२.९ दशलक्ष