नवी दिल्ली : चार दशकांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून लोकशाहीला घटनात्मक हुकूमशाहीत परावर्तीत केले होते, असे सांगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी रविवारी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जेटली यांनी फेसबुकवर पोस्ट करीत यावर भाष्य केले आहे.इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू केली. प्रत्येक नागरिकाला घटनेने जे अधिकार दिलेले आहेत ते यामुळे संपुष्टात आले होते. जेटलींनी म्हटले आहे की, इंदिरा गांधींकडून विरोधकांचा आवाज बंद करण्यात येत होता.‘दी इमर्जन्सी रिव्हिजिटेड’ नावाची लेखमाला जेटली लिहित असून त्यातील हा पहिला भाग होता. दुसरा भाग सोमवारी प्रसिद्ध होणार आहे.१९७१-७२ चा काळ हा इंदिरा गांधींसाठी राजकीय कारकिर्दीसाठी महत्वाचा होता. स्वत:च्या पक्षात त्यांना कोणतेही आव्हान नव्हते. त्यांनी १९७१ची निवडणूक सहज जिंकली. त्यानंतरची पाच वर्षे त्यांच्या हाती सत्ता एकवटली होती, असेही जेटली यांनी म्हटले आहे.
आणीबाणीने लोकशाही झाली घटनात्मक हुकूमशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 3:07 AM