मुंबईवरून केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरमला जात असलेल्या एका विमानात गुरुवारी बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. या धमकीनंतर तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर एकच खळबळ उडाली. यानंतर, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे. मात्र, बॉमच्या धमकीने संपूर्ण एअरपोर्टवर प्रचंड गोंधळ उडाला आहे.
यासंदर्भात माहिती देताना एअरपोर्ट प्रशासनाने म्हटले आहे, "एअर इंडिया फ्लाइट 657 तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर लँड झाले आहे. बॉम्बच्या धमकीनंतर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. संबंधित विमान सध्या आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना लवकरच बाहेर काडले जाईल. हे विमान आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आल्याने इतर विमानांना कसल्याही प्रकारचा धोका नाही. ही बॉमची धमकी अफवा तर नाही, यासंदर्भात तपास सुरू आहे. कारण अधिकांश प्रकरणात असेच घडते.
...अन् एअरपोर्टवर लागू झाली इमरजन्सी -स्थानीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, "विमानाची कसून तपासणी केली जात आहे. मुंबई-तिरुवनंतपुरम फ्लाइटच्या पायलटने विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रणाला बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. यानंतरच विमानतळावर इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. एअर इंडियाचे विमान सकाळी 8.10 वाजता तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरणार होते. मात्र, बॉम्बच्या धमकीमुळे ते लवकर आणण्यात आले. मुंबई विमानतळावरून पहाटे 5.45 वाजता या विमानाने उड्डाण केले होते.
विमानात एकूण 135 प्रवासी होते -टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या विमानात एकूण 135 प्रवासी होते. महत्वाचे म्हणजे, पायलटला ही माहिती कुठून मिळाली यासंदर्भात अद्याप काहीही समजू शकलेले नाही. पोलीस चौकशीनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.