विधानभवनात कर्मचार्याची आत्महत्या
By admin | Published: June 26, 2015 1:05 AM
मुंबई : गेल्या तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आलेल्या तणावातून एका कर्मचार्याने विधानभवनात आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास समोर आली. मुंब्रा येथे राहाणारे अर्जुन श्रीहरी कचरे (४२) हे विधानभवनातील अग्निशमन दलाचे कर्मचारी होते.
मुंबई : गेल्या तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आलेल्या तणावातून एका कर्मचार्याने विधानभवनात आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास समोर आली. मुंब्रा येथे राहाणारे अर्जुन श्रीहरी कचरे (४२) हे विधानभवनातील अग्निशमन दलाचे कर्मचारी होते.सकाळी ७ वाजता ड्युटीवर हजर झालेल्या कचरे यांचा मृतदेह विधानभवनाच्या घुमटावर आढळल्याची माहिती मरिनड्राईव्ह पोलिसांनी दिली. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. कचरे यांनी नेमकी कुठून उडी मारली याची माहिती कोणालाही नाही, असे पोलीस सांगितले. तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कचरे तणावात होते, ही माहिती सहकार्यांच्या जबाबातून समोर आली आहे. वेतन का मिळाले नव्हते याची चौकशी पोलीस करणार आहेत.