मुंबई :
कोरोना महामारीनंतर आता हळूहळू कार्यालये सुरू होत आहेत. परंतु कर्मचारी अजूनही घरून काम करण्यास इच्छुक असून, अनेकजण कार्यालयात येण्यास नकारघंटा दर्शवत आहेत. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, जागतिक स्तरावर २५ ते ३४ वयोगटातील बहुतेक तरुण कर्मचारी रोज कार्यालयात येण्यास तयार नाहीत. जर त्यांना त्यांच्या कंपनीने दररोज कार्यालयात येण्यास सांगितले, तर ते नवीन नोकरी शोधतील, असे अहवालात म्हटले आहे.
एडीपी संशोधन संस्थेच्या ‘पीपल ॲक्ट वर्क २०२२ : ए ग्लोबल वर्कफोर्स व्ह्यू’ अहवालानुसार, वृद्ध कामगारांपेक्षा तरुण कामगार दररोज कार्यालयात येण्यास तयार नाहीत. देशातील सर्वेक्षणानुसार ७६.३८ टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी कार्यालयातून दररोज काम करण्यास सांगितले गेल्यास ते नोकरी सोडतील,