मेडक- लॉकडाऊन काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना पाठविण्यात आलेलं वीज बील हे अधिक असल्याचा तक्रारी येत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्रातही ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नागरिकांना त्रास होऊ देऊ नका, असे निर्देश दिले आहेत. मात्र, वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून वीजबीलाचा तगादा लावल्यामुळे तेलंगणात नागरीक संतापल्याचे पाहायला मिळाले.
लाईटच बील हातात घेतल्यानंतर करंट लागतो की काय, अशी परिस्थिती या लॉकडाऊन काळातील वीजबील पाहून नागरिकांची झाली आहे. त्यामुळे, मेडक जिल्ह्यातील मुस्लापूर गावात पीडित नागरिकांनी वीज वितरण विभागाच्या कंपन्यांवर आपला रोष दाखवला. वीज बिलाच्या वसुलीसाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी चक्क खांबालाच बांधले. तसेच, वरिष्ठ अधिकारी आल्यानंतरच तुम्हाला सोडून देऊ, असा इशाराही दिला.