दुष्काळात ३० हजार कुटुंबाना रोजगार रोजगार हमी योजना : दोन लाख ६७ हजार कुटुंबांना जॉब कार्ड
By admin | Published: February 29, 2016 10:01 PM
सेंट्रल डेस्कसाठी
सेंट्रल डेस्कसाठीजळगाव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक मजुराला रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. त्या अनुशंगाने जिल्ह्यातील २९ हजार ९९३ मजुरांना रोजगार हमी योजनेतंर्गत काम देण्यात आले आहे. आतापर्यंत दोन लाख ६७ हजार ७५५ कुटुंबांना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हाभरात ग्रामपंचायतीमार्फत सुरु असलेल्या दोन हजार ३७५ कामांवर या मजुरांना काम देण्यात आले आहे. १ हजार ५४१ कुटुंबियांना जॉबकार्डची प्रतीक्षाअत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील १२९५ गावांमधील आणेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. ग्रामीण भागातील मजुरांच्या हातांना काम नसल्यामुळे शासनाने मागेल त्याला काम द्यावे असे आदेश देत रोजगार हमी योजनेतंर्गत विविध कामांना सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील दोन लाख ६७ हजार ७५५ कुटुंबांनी रोहयो अंतर्गत जॉबकार्डसाठी नोंदणी केली. जिल्हा प्रशासनाने दोन लाख ६६ हजार २१४ कुटुंबाना जॉब कार्ड प्रदान केले आहे. अद्याप एक हजार ५४१ कुटुंबियांना जॉबकार्डचे वाटप झालेले नाही.९१ हजार ८८५ मजुरांना कामाची गरजरोहयोअतंर्गत जिल्हा प्रशासनातर्फे पाटबंधारे, रस्ते, जलसंधारण, सामाजिक वनिकरण, कृषी यासह विविध कामे सुरु करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने जॉब कार्डचे वाटप केल्यानंतर रोहयो अंतर्गत काम करण्यास इच्छुक असलेल्या मजुरांची संख्या ही ९१ हजार ८८५ आहे. त्यापैकी या वर्षभरात ५३ हजार ८५ मजुरांना कामांची गरज आहे.३० हजार मजुरांना पुरविले कामेरोहयो अंतर्गत फेब्रुवारी महिन्यात ३३ हजार ७०६ जणांनी कामांची मागणी केली होती. त्यापैकी २९ हजार ९९३ जणांना जिल्हा प्रशासनाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यात पाच हजार ३० जणांना १०० दिवसांचे काम देण्यात आले आहे.३४ कोटी ४१ लाखांची रोजंदारीरोहयो अंतर्गत फेब्रुवारी महिन्यापर्यंत एकूण ५० कोटी २२ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यात ३४ कोटी ४२ लाख ६८ हजार रुपयांचा निधी मजुरीवर खर्च करण्यात आला आहे. तर १५ कोटी ८० लाख २३ हजार रुपयांचा निधी हा योजनेसाठी लागणार्या साहित्यावर खर्च झाले आहेत.