मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील बेरछा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे. बेरछा स्थानकावर प्राथमिक उपचार करून जखमीला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिथे मलम आणि बँडेज लावल्यानंतर त्याला सर्जिकल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने जखमी व्यक्तीला रिकाम्या सिलिंडरमधून ऑक्सिजन देण्यात आला. एवढंच नाही तर रुग्णालयातील कर्मचारी पल्स ऑक्सिमीटर आणि इंजेक्शन शोधत राहिले, मात्र ते सापडले नाहीत. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला.
राधेश्याम गुप्ता असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो छतरपूर येथील रहिवासी आहे. राधेश्याम गुप्ता हे उज्जैनहून महाकालाचे दर्शन घेऊन घरी परतत होता. सकाळी अकराच्या सुमारास ते भोपाळला जाण्यासाठी उज्जैनहून निघाला. छतरपूरला जायचं होतं. याच दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास राधेश्याम पाणी भरण्यासाठी बेरछा स्थानकावर उतरला. ट्रेन सुरु झाल्यावर डब्यात चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला. स्थानकावर प्राथमिक उपचारानंतर जखमी राधेश्यामला बेरछा येथून रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून वॉर्डात उपस्थित असलेल्या काही लोकांनी जखमीच्या बेडवर ऑक्सिजन सिलिंडर आणला, त्याची प्रकृती खराब होती. सिलिंडरमध्ये ऑक्सिजन नव्हता. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाली. डॉक्टरांनी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर नवीन झाला यांना बोलावून घेतले. डॉक्टर सुमारे अर्धा तास उशिरा जखमी व्यक्तीपर्यंत पोहोचले. तोपर्यंत जखमी राधेश्यामचा मृत्यू झाला होता.
बेरछा स्थानकावरून मिळालेल्या माहितीनुसार, दाहोद-भोपाळ क्रमांक 19339 या ट्रेनने प्रवास करणारी व्यक्ती पाणी भरण्यासाठी स्टेशनवर उतरली होती. तो पाणी भरू लागला. इतक्यात ट्रेन पुढे जाऊ लागली. ती व्यक्ती त्याच्या कोचकडे धावली. ट्रेनचा वेग जरा जास्तच होता. त्याने चढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. डोक्याला, कानाला, पाठीला इ. दुखापत होऊन रक्त येत होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.