श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ आणि अवंतीपोरा भागात शुक्रवारी भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी 8 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामधील 5 दहशतवादी शोपियाँमधील आणि 3 पंपोरमधील आहेत. आधीपासूनच या दोन्ही भागात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू होती. जवानांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.
गुरुवारी अवंतीपोरा जिल्ह्यातील पंपोर भागात तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लगेचच सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली. पंपोरच्या मीज भागात गुरुवारी दुपारीपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाला यश मिळाले. यावेळी दोन दहशतवादी जवळच्या मशिदीत लपले होते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी सांगितले.
सुरक्षा दलाच्या जवानांची शोध मोहिम सुरुच ठेवली होती. त्यानंतर रात्रभर संघर्षानंतर शुक्रवारी सकाळी जवानांनी मशिदीत लपून बसलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. डीजीपी दिलबाग सिंग यांनी सांगितले. याव्यतिरिक्त शोपियाँच्या मुनंद येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले. या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. येथे आणखी दहशतवादी लपण्याची शक्यता आहे, असेही डीजीपी दिलबाग सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या मंगळवारी शोपियाँमध्ये जवळपास दीड तास सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. सुरक्षा दलाच्या हाती लागलेल्या माहितीनंतर, या भागात शोध मोहिम राबविण्यात आली होती. याच दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. हे तिघेही हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी होते.
आणखी बातम्या...
देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती
भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग
कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"