Encounter with Naxals :छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी(दि.22) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. तर, भेज्जी भागात अजूनही चकमक सुरुच आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, आतापर्यंत ठार झालेल्या 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून AK-47, एसएलआर आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, गुरुवारी नक्षलवादी ओडिशातून छत्तीसगडमध्ये घुसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले.
भेज्जी परिसर जंगलांनी वेढलेला अधिकाऱ्याने सांगितले की, भेज्जी परिसरात डीआरजी आणि सीआरपीएफ टीमसोबत नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ज्या भागात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक होत आहे तो परिसर जंगलाने वेढलेला आहे. जवळच पर्वत आहेत. कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम आणि भांडारपदर गावांजवळील जंगलात ही चकमक सुरू आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सुरक्षा दलांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, आमचे सरकार नक्षलवादाबद्दल झिरो टॉलरन्स धोरणावर काम करत आहे. बस्तरमधील विकास, शांतता आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा खात्मा निश्चित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जात आहोत.
यापूर्वी 5 नक्षलवादी ठार पाच दिवसांपूर्वी, रविवारी छत्तीसगडच्या कांकेरमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून इंसास, एक एसएलआर आणि 12 बोअर रायफलसह मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. याशिवाय, रविवारीच छत्तीसगडमधील बलरामपूरमध्ये जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. शोध मोहिमेदरम्यान सैनिकांनी रस्त्याच्या कडेला सुमारे 4 किलो वजनाचा आयडी टिफिन बॉम्ब निकामी केला.
नारायणपूरमध्ये 32 नक्षलवादी ठारयापूर्वी ऑक्टोबर महिन्यात छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 32 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर नक्षलवादी कारवायांची माहिती जवानांना मिळाली होती. या इनपुटवर जवानांनी ऑपरेशन सुरू केले आणि 32 नक्षलवाद्यांना ठार केले.