जयपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना आपण नक्षल्यांविरुद्ध लढण्यासाठी पोलिसांना पूर्ण मोकळीक दिली होती, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी येथे सांगितल़े खुशाल एन्काऊंटर करा. मानवाधिकारवाल्यांचे आम्ही पाहून घेऊ, असे त्यांनी इशा:याइशा:यांत सांगितले.
येथे राजस्थान पोलीस अकादमीत देशभरातील पोलीस प्रशिक्षण अकादमी प्रमुखांच्या 33 व्या अखिल भारतीय परिषदेला संबोधित करताना ते बोलत होत़े ते म्हणाले की, मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री असताना राज्यात माओवाद्यांची समस्या गंभीर होती़ मी पोलिसांना या समस्येशी निपटण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होत़े मानवाधिकार संघटना आपल्याला कठडय़ात उभे करील, अशी भीती पोलिसांना वाटत होती; पण मी ठाम होतो़ कुठल्याही फाईलवर थेट आदेश काढायचा असेल तर मी तो द्यायला तयार आह़े सर्व अडचणींचा सामना करायलाही मी सज्ज आहे, असे मी पोलीस अधिका:यांना स्पष्टपणो
सांगितले होत़े
4नक्षलवाद, दहशतवाद आणि फुटीरवादाच्या मुद्यावर केंद्र सरकार लवकरच एक व्यापक योजना आणणार असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.
4काही बुद्धिजीवी आणि सेवानिवृत्त अधिका:यांशी चर्चेतून एक सर्वसमावेशक योजना समोर
आली आह़े ही योजना जवळपास तयार आह़े
4दहशतवाद, माओवाद, नक्षलवाद ही देशासमोरील मोठी आव्हाने आहेत़ या आव्हानांशी निपटण्यासाठी जनता सूचना करू शकत़े