आऊट हाऊसचे अतिक्रमण हटविले
By admin | Published: February 23, 2016 12:03 AM
फोटो- ७१
फोटो- ७१ जळगाव : निवृत्तीनगरात केरळी महिला ट्रस्टच्या मंदिराजवळीलच एका घराचे अनधिकृतपणे बांधलेले आऊटहाऊस मनपा अतिक्रमण विभागाने तोडले.नगररचना विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्याने सुनावणी घेऊन सकारण आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले आहेत. त्यातील सुमारे १०-१२ सकारण आदेश कार्यवाहीविना पडून असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार दररोज तीन ठिकाणी कारवाई केली जात आहे. त्यानुसार दोन ठिकाणी गेलेले अतिक्रमण विभागाचे पथक रिकाम्या हाती परतले. दुपारी निवृत्तीनगरातील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेले. निवृत्ती नगरातील प्लॉट नं.१९ मध्ये अरूण शिंदे यांच्या जागेत अनधिकृतपणे बांधलेल्या आऊटहाऊसबाबत बळवंत चव्हाण यांनी तक्रार केली होती.त्यावर नगररचना विभागाने कारवाईबाबत सकारण आदेश दिले होते. मनपाचे पथक तेथे गेले. मात्र घरमालकाने स्वत:हूनच अतिक्रमण काढून घेण्यास सुरूवात केली. सायंकाळी उशीरापर्यंत अतिक्रमण तोडण्यात आले.--- इन्फो---दोन ठिकाणांहून रिकाम्या हाती परतले पथकमनपा अतिक्रमण विभागाचे पथक ख्वॉजामिया चौक परिसरात कारवाईसाठी गेले होते. मात्र त्या अतिक्रमणावर कारवाईस न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याने पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. आणखी एका ठिकाणी हाच अनुभव आला.