रेल्वे काढणार झोपटपीचे अतिक्रण
By admin | Published: February 02, 2016 12:15 AM
दुहेरीकरण : ९, १० रोजी होणार कारवाई
दुहेरीकरण : ९, १० रोजी होणार कारवाईजळगाव : जळगाव -उधना रेल्वे मार्गाच्या दुहेेरीकरणात अडथडा ठरणारी सुरत गेट जवळील झोपडपीचे अतिक्रमाण काढण्याची कारवाई ९ व १० रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु करण्यात येणार आहे. संबंधितांना प्रशासनातर्फे नोटीस बजावण्यात असल्याचेे सूत्रांनी सांगितले.या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम शहरापर्यंत पूर्ण होत आले आहे. हा मार्ग रेल्वेस्थानकावर जोडण्यासाठी सुरत गेट जवळील झोपडपीच्या अतिक्रमणाचा अडथडा निर्माण झाल्याने हे अतिक्रमण काढण्याची प्रकिया रेल्वे प्रशासनाने सुरु केली आहे.३५० झोपड्यारेल्वेच्या या जागेवर जवळपास ३५० झोपड्या आहे. संबंधिताना प्रशासनातर्फे नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर डिसेंबर महिण्यातही अतिक्रमण काढून घेण्यासंबंधात नोटीसा देण्यात आल्या आहे. मात्र अतिक्रमण काढण्यात आले नसल्याने. आता यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.बाजू मांडण्याचे निमंत्रणसंबंधितांना त्यांचे म्हणने सादर करण्यासाठी डीआरएम कार्यालयाकडून वेळ देण्यात आली होती. मात्र झोपडपी धारकांकडून कुठलीच हरकत नोंदविण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.कारवाईसाठी सज्जअतिक्रमणावर हतोडा मारण्याची संपूर्ण तयारी रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. त्यानुसार आरपीएफ व स्थानिक पोलीसांच्या उपस्थितीत ९ रोजी सकाळी ८ वाजेपासून कारवाई सुरु करण्यात येणार आहे.काम प्रगतीवर अतक्रमण काढण्यात आल्यावर या जागेवर तात्काळ नवीन मार्गाचे काम होऊन तो रेल्वे यार्डापर्यंत जोडण्याच्या कामास गती मिळेल.यामुळे दुहेरीकरण झालेला हा मार्ग वाहतूकीसाठी खुला होण्यास मदत होणार आहे.