नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या (Daily Covid Cases) जून अखेरीस 15 ते 20 हजारांपर्यंत येऊ शकते, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. सध्या हा आकडा 3 लाखांच्या जवळपास आहेत, परंतु यासाठी कोरोना लसीकरण वेगाने करावे लागेल आणि पूर्वीप्रमाणेच सतर्कता ठेवली पाहिजे. कोरोनाची तिसरी लाट 6 ते 8 महिन्यांत येऊ शकते, असे सरकारी समितीच्या सदस्याने सांगितले आहे. तसेच, जर पुरेशा संख्येने कोरोना लसीकरण झाल्यास कोरोनाची प्रकरणे झपाट्याने खाली येतील, असे सरकारी समितीचे सदस्य डॉ. एम. विद्यासागर म्हणाले. (by the end of june coronavirus daily cases will be reduced to 15-20 thousand the claim of a member of the government panel)
आयआयटी हैदराबाद येथील डॉ. एम. विद्यासागर (IIT Hyderabad Dr M Vidyasagar) हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य आहेत. त्यांनी गणित मॉडेलच्या (mathematical model) आधारावर कोरोना प्रकरणांचे मॅपिंग केले आहे. यावेळी देशात कोरोनाविरूद्ध लसीकरण अभियान वेगाने चालवण्याची गरज आहे. लोकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. परंतु पहिल्या लाटेत कोरोनाविरोधात इम्युनिटी निर्माण झाली होती, त्यामध्येही ही प्रतिकारशक्ती कमी झाली, असे डॉ. एम विद्यासागर यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीला सांगितले.
(मोठी बातमी! महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक)
याचबरोबर, अलीकडील वैज्ञानिक अभ्यासानुसार असे संकेत मिळत आहेत की, ज्या लोकांमध्ये इम्युनिटी तयार होत आहे. ती 6 ते 8 महिन्यांत गायब होते. सध्याच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत 30 टक्के अधिक रुग्ण येत आहेत. त्यांची प्रतिकारशक्ती 6-8 महिन्यांत निघून जाईल. त्यामुळे प्रतिरोधकशक्ती राखण्यासाठी लसीकरणावर जोर देणे आवश्यक आहे, असे डॉ. एम. विद्यासागर म्हणाले.
याशिवाय, जर लसीकरण अभियान वेगाने राबविले तर नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते, असे ते म्हणाले. दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,57,72,400 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,76,070 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,874 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,87,122 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.