शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 9:45 PM

भारत-चीन सीमा वादात मध्यस्थी करण्याची तयारी कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली होती

नवी दिल्ली: एकीकडे कोरोना संकट दिवसागणिक आणखी गहिरं होत असताना दुसरीकडे लडाख सीमेवर चीननं कुरघोड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. हा तणाव निवळण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. यावरून भारतानं भूमिका स्पष्ट केली आहे. सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी आम्ही चीनच्या संपर्कात आहोत. आम्हाला कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असं उत्तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेला दिलं आहे.भारत आणि चीनमधील सीमा वादाच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यासाठी आपण तयार आहोत, असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केलं होतं. 'भारत आणि चीनची तयारी असल्यास अमेरिकेची मध्यस्थी करण्याची तयारी आहे,' असं ट्रम्प म्हणाले होते. याआधी गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असतानाही ट्रम्प यांनी समेट घडवण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुद्दा आहे. हा द्विपक्षीय प्रश्न असल्यानं तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचं उत्तर भारतानं दिलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नेपाळ आणि चीन यांच्यासोबत सध्या सुरू असलेल्या सीमा वादाबद्दल सरकारची भूमिका मांडली. 'भारत आणि नेपाळचे संबंध अतिशय जुने आहेत. कोरोना संकटाच्या काळात आपण कोणत्याही परवान्याशिवाय व्यापार करत आहोत. सध्या नेपाळसोबत निर्माण झालेल्या वादावर आमचं लक्ष आहे. भारत संवेदनशीलपणे आपल्या शेजाऱ्यांसोबतचे संबंध कायम ठेवेल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत निर्माण झालेल्या सीमावादावरही श्रीवास्तव यांनी भाष्य केलं. 'आपले जवान अतिशय जबाबदारीनं सीमावर्ती भागातील परिस्थिती हाताळत आहेत. दोन्ही देशांनी मिळून तयार केलेल्या प्रोटोकॉलचं सैन्याकडून पालन केलं जात आहे. नेतृत्त्वाकडून देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी जवान करत आहेत. देशाचं अखंडत्व आणि सार्वभौमत्व राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,' असं श्रीवास्तव म्हणाले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिकाchinaचीनPakistanपाकिस्तानladakhलडाख