ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 21 - खम्माम पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाचे असलेले विवाहबाह्य संबंध तेव्हा समोर आले जेव्हा महिलेच्या पतीनेच त्याला रंगेहाथ पकडलं. विजय कुमार असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून मोतीनगर परिसरातील एका महिलेचं आणि त्यांचं अफेअर चालू होते. महिलेच्या पतीनेच दोघांना त्या अवस्थेत असताना रंगेहाथ पकडलं आणि ही माहिती उघड झाली.
विजय कुमार यांचं लग्न झालं असून त्यांना दोन मुलं आहेत. आठ महिन्यांपुर्वी या महिलेशी त्यांची फेसबूकच्या माध्यमातून ओळख झाली होती. या महिलेचा पती सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांना एक मुलगा आहे. दोघांमध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि भेटीगाठी सुरु झाल्या. दोघांनी एकमेकांशी शरिरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली.
दोघांनी लपून छपून भेटण्यास सुरुवात केली. आपली पत्नी जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवत असल्याने पतीला संशय आला आणि त्याने एक सापळा रचला. आपण शहराबाहेर जात असल्याची खोटी बतावणी त्याने पत्नीला केली. सुरक्षारक्षकाला फ्लॅटमध्ये कोणी आल्यास लगेच कळवायची सूचनाही त्याने केली होती. त्यानुसार त्याने रंगेहाथ पोलीस उप-निरीक्षक विजय कुमारला पत्नीसोबत रंगेहाथ पकडलं.