उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये लग्नाची वरात वधूशिवाय परतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वधूने वराच्या गळ्यात पुष्पहार घातला, परंतु सप्तपदी घेण्यास नकार दिला. यामागचे कारण समजल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसवा आहे. वधूला आधी सांगण्यात आलं की वराला सरकारी नोकरी आहे, पण वर प्रायव्हेट इंजिनिअर आहे. वधूला समजताच तिने लग्नास नकार दिला. दोन्ही बाजूच्या लोकांनी वधूला समजावलं, पण ती लग्नासाठी तयार झाली नाही.
सरकारी क्लार्कच्या मुलाच्या लग्नाची वरात फारुखाबादला आली होती, त्याचं लग्नाच्या मंडपात मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं. लग्नाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात आली आणि सुरुवातीचे विधी पार पडले. एकमेकांना हार देखील घातला. याच दरम्यान कोणीतरी वराला जाब विचारला आणि एकच गोंधळ उडाला.
मुलीच्या बाजूच्या लोकांनी मुलाच्या वडिलांकडे वराच्या नोकरीबद्दल विचारपूस केली आणि त्यांनी आपला मुलगा सिव्हिल इंजिनिअर असल्याचं सांगितलं. याबाबत नववधूला समजल्यावर ती म्हणाली की, तिला सरकारी नोकरी असलेला वर आहे. ती खासगी नोकरी असलेल्या कोणाशी लग्न करणार नाही. हे ऐकून दोन्ही बाजूचे लोक अवाक झाले व नववधूला समजावण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु वधूने कोणाचंही ऐकले नाही
ही बाब नववधूला समजल्यावर त्याने फोनवरून आपली पे स्लिप मागवली आणि वधूच्या बाजूच्या लोकांना दाखवली, त्यात महिन्याला १ लाख २५ हजार रुपये पगार लिहिला होता. असं असूनही, वधू ठाम होती आणि तिने लग्न करण्यास पूर्णपणे नकार दिला. नंतर समाजातील लोकांनी दोन्ही पक्षांकडून होणारा खर्च वाटून घेण्याचं ठरवलं. यानंतर नवरदेव वधूशिवाय घरी परतला.