शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

अरे व्वा! डॉक्टर होण्यासाठी इंजिनिअर चंदनने 18 लाखांची नोकरी सोडली; MBBS साठी घेतलं एडमिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 11:21 AM

चंदनला डॉक्टर बनण्याची हौस एवढी आहे की, त्याने 18 लाखांचे पॅकेज सोडून येथे एडमिशन घेतलं आहे.

एका इंजिनिअरच्या विद्यार्थ्याने शहीद निर्मल मेहतो मेडिकल कॉलेज (SNMMCH), धनबादमध्ये मेडिकलच्या अभ्यासासाठी एडमिशन घेतलं आहे. ANMMCH मध्ये विद्यार्थी चंदन कुमारचं एडमिशन चर्चेचा विषय राहिला आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये इंजिनिअरने डॉक्टर होण्यासाठी एमबीबीएसला एडमिशन घेतल्याची ही पहिलीच घटना आहे. एवढच नाही तर चंदनला डॉक्टर बनण्याची हौस एवढी आहे की, त्याने 18 लाखांचे पॅकेज सोडून येथे एडमिशन घेतलं आहे.

चंदन कुमारची आई आयआयटी आयएसएममध्ये डेप्युटी असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. एसएनएमसीएचमध्ये एडमिशनसाठी आलेल्या चंदनने सांगितले की, लहानपणापासूनच त्याचा मेडिकलकडे कल होता. ISM Annexe मधून 2008 मध्ये प्लस टू केल्यानंतर, त्याला मेडिकल आणि इंजिनिअर या दोन्ही विषयांमध्ये रस होता, परंतु मेडिकलमध्ये निवड होऊ शकली नाही. त्यांची इंजिनिअरमध्ये निवड झाली आणि 2012 मध्ये एनआयसी वारंगल आंध्र प्रदेशमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअररिंग केलं.

इंजिनीअरिंग केल्यानंतर चंदनने नोकरी केली, पण या काळात तो एमबीबीएसची पुस्तके वाचत राहिला आणि त्याची आवड वाढत गेली. 2015 मध्येही त्याने मेडिकल एडमिशनसाठी प्रयत्न केले होते, पण रँक कमी असल्याने मिळालं नाही. यावेळी त्याने वैद्यकीय प्रवेशात 605 गुण मिळवले आणि त्याचा क्रमांक 2650 होता. त्याने SLN MCH मध्ये स्वतःची नोंदणी केली.

चंदनने असेही सांगितले की, त्याने कधीही कोचिंग घेतले नाही, त्याला 12वीच्या वर्गात असताना बायोलॉजीचे शिक्षक आणि हिंदी शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन आजही त्याच्यासाठी उपयुक्त आहे. धनबादचे एसएनएमएमएचचे अधीक्षक अनिल कुमार म्हणाले की, इंजिनिअर केल्यानंतर जर त्याला डॉक्टर होण्याची आवड असेल तर ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इंजिनीअरिंगमधून मेडिकलला एडमिशन घेतलेला हा आमच्या केंद्रातील पहिला विद्यार्थी आहे.

चंदन कुमार यांची पत्नी अपर्णा SBI मध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे आणि मोठी बहीण गोरी कुमारी बिहार सरकारमध्ये BDO म्हणून कार्यरत आहे. धाकटी बहीण दीक्षा राणी छत्तीसगडच्या इंद्र कला कैलाश विद्यापीठातून कथ्थकमध्ये एमए झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.