मध्य प्रदेशातील भोपाळमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीने ट्रेनमधून प्रवास करताना केलेल्या चोरीची सर्वांसमोर पोलखोल केली आहे. इतकेच नाही तर तिने पतीने चोरलेल्या वस्तूंचा एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच महिलेने पतीविरोधात तक्रारही केली आहे.
ट्रेनमधून प्रवास करताना पतीला बेडशीट, उशी आणि टॉवेल चोरण्याची सवय लागली होती. य़ा व्यक्तीने ट्रेनमधून एक दोन नव्हे तर 40 टॉवेल, 30 चादरी आणि 6 ब्लँकेट चोरले होते. ज्या व्यक्तीने ही चोरी केली आहे तो एका मोठ्या कंपनीत इंजिनिअर आहे. मात्र त्याच्या या सवयीमुळे नाराज होऊन त्याच्या पत्नीने रेल्वेत त्याच्याबद्दल तक्रार केली.
पत्नीच्या तक्रारीनंतर रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने त्याच्या घरी पोहोचले आणि सर्व सामान घेऊन परतले. पत्नीने चोरीच्या वस्तूंचा व्हिडिओही बनवला जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अफसाना नावाची महिला भोपाळमधील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पतीच्या चोरीच्या सवयीमुळे ती खूप नाराज झाली होती.
व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या पतीला एक विचित्र सवय लागली होती. तो रेल्वेतून ब्लँकेट, चादरी, उशा चोरून आपल्या घरी आणायचा. त्यामुळे त्याच्या पत्नीने नाराज होऊन रेल्वेकडे तक्रार केली. त्यानंतर रेल्वेचे अधिकारी आले आणि त्यांनी सर्व सामान उचलले आणि ते सोबत घेऊन गेले.