रात्रभर डास चावल्यानं मुख्यमंत्री संतापले; अवघ्या ४८ तासांत इंजीनियरवर 'कठोर' कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 08:06 AM2021-02-20T08:06:55+5:302021-02-20T08:14:42+5:30

मुख्यमंत्र्यांना रात्रभर त्रास झाल्यानं इंजीनियरवर कारवाई; अतिथीगृहात स्वच्छता नसल्यानं कारवाईचे आदेश

engineer suspended after mosquitoes bite mp cm shivraj singh chouhan in sidhi circuit house | रात्रभर डास चावल्यानं मुख्यमंत्री संतापले; अवघ्या ४८ तासांत इंजीनियरवर 'कठोर' कारवाई

रात्रभर डास चावल्यानं मुख्यमंत्री संतापले; अवघ्या ४८ तासांत इंजीनियरवर 'कठोर' कारवाई

Next

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात बस कालव्यात कोसळून ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (MP CM Shivraj Singh Chouhan) मृतांच्या कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी सीधीमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांचा मुक्काम अतिथीगृहात होता. सर्किट हाऊसमध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे शिवराज सिंह चौहान यांना रात्रभर डास चावले. याशिवाय टाकीमधून पाणी ओव्हर फ्लो होत होतं. आता या प्रकरणी प्रशासनानं कारवाई केली आहे.

...अन् एकाच चितेवर पती-पत्नी दोघांवर अंत्यसंस्कार; कुटुंबावर कोसळला दुखा:चा डोंगर 

रिवा विभागाच्या आयुक्तांनी कारवाईचा आदेश जारी केला आहे. '१७ फेब्रुवारीला एक विशिष्ट अतिथी सीधी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते सर्किट हाऊसमध्ये विश्रांतीसाठी थांबले. याची पूर्वसूचना सर्किट हाऊसचे प्रभारी बाबूलाल गुप्ता यांना देण्यात आली होती. मात्र सर्किट हाऊस आणि परिसरात अस्वच्छता होती,' असं आयुक्तांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुप्ता यांना निलंबित करण्यात आलं आहे.

बस बुडत असताना या मुलीने प्रसंगावधान दाखवले, भावासोबत मिळून अनेकांचे प्राण वाचवले

'सर्किट हाऊसमधील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होत होती. खोलीत डास असल्याची तक्रारदेखील प्राप्त झाली आहे. यातून अतिथीगृहाची देखभाल व्यवस्थित झाली नसल्याचं स्पष्ट होतं. गुप्ता यांनी त्यांचं काम नीट न केलं नाही. त्यामुळे विशिष्ट अतिथींना त्रास झाला. गुप्ता यांच्यामुळे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा डागाळली. हा शुद्ध बेजबाबदारपणा आहे. त्यामुळे त्यांना निलंबित केलं जात आहे,' असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

सीधी जिल्ह्यात बसला भीषण अपघात झाल्यानं मुख्यमंत्री चौहान जिल्ह्यात आले होते. सीधी जिल्हा मुख्यालयापासून ८० किलोमीटर दूर असलेल्या पटना गावाजवळ मंगळवारी सकाळी बसला अपघात झाला. यामध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला. बस थेट कालव्यात कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन चौहान यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान दिलं.

Web Title: engineer suspended after mosquitoes bite mp cm shivraj singh chouhan in sidhi circuit house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.