नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २ ऑगस्ट रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एका नव्या डिजिटल सॉल्यूशन लॉन्च करणार आहेत. याच दरम्यान मोदींनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अशा काही घटना घडल्या ज्यामुळे सर्व भारतीयांसाठी सुखद धक्का आहे असं ट्विट केले आहे. ऑल्मिपिकमध्ये खेळाडूंचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, टोकिया ऑल्मिपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करून भारताला नव्या शिखरावर पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. १३० कोटी भारतीयांसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. भारताने ऑगस्ट महिन्यात एन्ट्री केली आहे. अमृत महोत्सवाच्या सुरुवातीचं हे प्रतीक आहे. आपण खूप अशा घटना पाहिल्या ज्यामुळे प्रत्येक भारतीय सुखावला आहे. रेकॉर्डस्तरीय लसीकरण झालं आहे. जीएसटी वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत पी व्ही सिंधूने ना केवळ एक पदक जिंकलं तर ऑल्मिपिकमध्ये पुरुष आणि महिला हॉकी टीमने ऐतिहासिक कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. १३० कोटी भारतीय भारताला यशाच्या नव्या शिखरावर पोहचवण्यासाठी मेहनत घेतील असा मला विश्वास आहे. कारण देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या पेमेंट APP चं करणार लॉन्चिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज एका नव्या डिजिटल सॉल्यूशनचं लॉन्चिंग करणार आहे. ही एक ई वाऊचर आधारित डिजिटल पेमेंट सॉल्यूशन e-RUPI असेल. डिजिटल व्यवहारांना अधिक चालना देणे आणि सहज, सुरक्षित व्यवहार करणे यावर भर दिला जाणार आहे. RUPI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं वित्त मंत्रालय, कुटुंब कल्याण आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत मिळून तयार केले आहे.