नवी दिल्ली - देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांच्या मुलांच्या भवितव्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शहीद, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे सरकारने जाहीर केले आहे. याआधी शहीद, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण शुल्क आणि हॉस्टेल फी मिळून दरमहा 10 हजार रुपये देण्याची मर्यादा होती. मात्रा आता ही मर्यादा रद्द करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. लष्करातील शहीद जवानांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्यात येणाऱ्या मदतीवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत आजीमाजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने हा आदेश मागे घेऊन ऑफिसर रँक आणि अधिकारी रँकच्या खालील रँकमधील शहीद जवानांच्या मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च सरकार उचलणार आहे. या निर्णयाचा लाभ जखमी, बेपत्ता आणि शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना मिळणार आहे.
शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 1:38 PM