शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

केंद्रीय तंत्रविज्ञान खात्यातर्फे उद्योजकता विकास कार्यशाळा

By admin | Published: July 09, 2015 9:53 PM

नाशिक : कंेद्रीय तंत्रविज्ञान खाते, नवी दिल्ली पुरस्कृत स्टेड प्रकल्पाअंतर्गत उद्योगवर्धिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून १५ आणि १६ जुलै रोजी कालिदास कलामंदिर येथे दुपारी १२ ते ८ दरम्यान उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती सुनील चांडक, संचालक उद्योगवर्धिनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक : कंेद्रीय तंत्रविज्ञान खाते, नवी दिल्ली पुरस्कृत स्टेड प्रकल्पाअंतर्गत उद्योगवर्धिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून १५ आणि १६ जुलै रोजी कालिदास कलामंदिर येथे दुपारी १२ ते ८ दरम्यान उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती सुनील चांडक, संचालक उद्योगवर्धिनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विशेषत: तंत्रविज्ञान शिक्षित आणि सर्वसामान्यांमध्ये उद्योजकतेबद्दल आकर्षण निर्माण करून त्यांना उपलब्ध उद्योग-व्यवसाय संधी आणि त्यासाठी असणार्‍या शासकीय कर्ज आणि अनुदान योजनांची माहिती देऊन त्यांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी तत्पर करावे हा आहे. यातूनच १०० प्रशिक्षणार्थींची निवड करून त्यांना उद्योग निवडीपासून उभारणीपर्यंत सखोल मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. मागील वर्षीदेखील अशा प्रकारचे भव्य आयोजन केले होते, त्यास ११०० नवउद्योजकांचा प्रतिसाद लाभला होता आणि १०५ लाभार्थींची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५४ प्रशिक्षणार्थींनी आपले व्यवसायदेखील सुरू केले आहेत. चर्चासत्रात उद्योजक होऊ इच्छिणार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करत प्रवेशासाठी उद्योवर्धिनी, तिसरा मजला, निर्माण इन्सपायर, कान्हेरेवाडी, जुन्या सीबीएससमोर, नाशिक . फोन ७७७४०५४७१९, ९८२२९३४७१९ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.