- संतोष ठाकूरनवी दिल्ली : बारावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसह अन्य मानव्यविद्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा नियम करावा, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला सांगितले आहे.जादा गुण मिळविण्यासाठी मुलांवर येणारे दडपण, त्यातून नैराश्य व प्रसंगी आत्महत्या हे रोखण्यासाठी मनुष्यबळ खात्याने बदल करण्याचे ठरविले आहे.कॉलेज वा विद्यापीठाने या नियमाचे पालन केले नाही, तर त्यांची मान्यता रद्द करण्यासारखे उपाय योजले जावेत.सामान्य अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश परीक्षेमार्फत प्रवेश दिला जावा, यासाठी नियम करावेत. हा नियम २०१९पासून लागू करण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आर्ट्स, सायन्स व कॉमर्ससाठीही प्रवेश परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:55 AM