नवी दिल्ली : प्रदूषणामुळे माणसांचे आयुष्य कमी होते, हे भारतीय संशोधनातून समोर आलेले नाही, असा दावा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत केला आहे.लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष दस्तीदार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर म्हणाले, प्रदूषणावरून भीतीचे वातावरण निर्माण करू नये. प्रदूषणामुळे माणसांचे आयुष्य घटते, ही बाब भारतीय संशोधनातून समोर आलेली नाही. प्रदूषणामुळे माणसांचे साडेचार वर्षांनी आयुष्य कमी होत असल्याची बाब काही संशोधनातून समोर आली आहे. यावर केंद्र सरकारने काय उपाययोजना करीत आहेत, असा प्रश्न काकोली घोष यांनी पूरक प्रश्न विचारला होता.काँग्रेस सदस्य गौरव गोगोई यांनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्याची सूचना मांडली. या सूचनेवर केंद्र सरकार विचार करील, असे उत्तर जावडेकर यांनी दिले.
प्रदूषणामुळे आयुष्य घटते, असे संशोधन नाही, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 2:19 AM