नवी दिल्ली : कामगार भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) ६ कोटी लाभधारकांच्या खात्यांत मिळून २०१८-१९ या वर्षासाठी ८.६५ टक्के दराने व्याजापोटी लवकरच ५४ हजार कोटी रुपये जमा होणार आहे. या आर्थिक वर्षात ज्यांचा ईपीएफ खात्यावर वळता करायचा आहे, त्यांनाही ८.६५ टक्के व्याज दिले जाईल. याआधी व्याजाचा दर ८.५५ टक्के होता. तो २०१७-१८ साली संमत झाला होता.यापुढे कोणत्याही सभासदाला ईपीएफओला मिस कॉल देऊन वा एसएमएस सेवेद्वारे याची माहिती मिळेल. आपल्या ईपीएफ खात्यात किती शिल्लक आहे, याची माहिती मिळविण्यासाठी ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. संबंधित यंत्रणा तुम्हाला एसएमएसद्वारे आवश्यक ती माहिती पाठवेल. पीएफची किती रक्कम जमा आहे हे जाणून घेण्यासाठी ७७३८२९९८९९ या क्रमांकावर EPFOHO असा एसएमएस रजिस्टर मोबाइल क्रमांकावरून पाठवल्यास पीएफ खात्यातील रकमेची सर्व माहिती तुम्हाला मिळू शकेल. ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन वा उमंग अॅप डाऊनलोड करून पीएफ खात्यात किती शिल्लक आहे हे पाहाता येईल.उमंग अॅपद्वारे मोबाइलवर पाहा पीएफ खातेस्मार्टफोनमध्ये उमंग अॅप इन्स्टॉल करून ईपीएफओ सिलेक्ट कराएम्प्लॉयी सेंट्रिक सर्व्हिसेसवर क्लिक कराईपीएफमधील शिल्लक पाहाण्यासाठी व्ह्यू पासबुकवर क्लिक करायूएएन क्रमांक एन्टर करून गेट ओटीपीवर क्लिक कराओटीपी क्रमांक एन्टर करून लॉगिनवर क्लिक कराकंपनीचा मेम्बर आयडी निवडाईपीएफओ खात्याचे पासबुक तुम्हाला पाहाता येईल. ज्यांनी आपला यूएनएन क्रमांक अॅक्टिव्हेट केला आहे त्यांनाच आपल्या ईपीएफओ खात्यातील शिल्लक पाहाता येईल.वेबसाइटवर पीएफ खाते पाहणे शक्यwww.epfindia.gov.in या वेबसाइटला जा.स्क्रीनच्या डाव्या बाजूला जाऊन तिथे अवर सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा.फॉर एम्लॉईज या पर्यायावर क्लिक करातुमचा यूएएन क्रमांक व पासवर्ड देऊन लॉग इन कराआता तुमच्या खात्यात किती शिल्लक हे पाहू शकाल