शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

EPFO कडून दिला जातोय ७ लाख रुपयांचा मोफत लाभ, असा करा अर्ज...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 1:38 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) ग्राहकांना ७ लाख रुपयांचा अगदी मोफत लाभ मिळत आहे. पण यासाठी खातेधारकांना एक महत्वाचं काम करावं लागणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) ग्राहकांना ७ लाख रुपयांचा अगदी मोफत लाभ मिळत आहे. पण यासाठी खातेधारकांना एक महत्वाचं काम करावं लागणार आहे. ई-नॉमिनेशनशी निगडीत हे काम आहे. जे ग्राहक आपल्या पीएफ खात्यावर ई-नॉमिनेशन फाइल करतील त्यांनाच ७ लाख रुपयांचा लाभ मिळवता येणार आहे. ईपीएफओनं एका नोटिफिकेशनमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. 

पीएफ खातं असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ई-नॉमिनेशन बंधनकारक करण्यात आलं आहे. जेणेकरून खातेदाराला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध सुविधा त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनीला देता येईल. पीएफमधील सामाजिक सुरक्षा संबंधित सुविधेचा लाभ नॉमिनीला दिला जाऊ शकतो. 

EPFO ची ई-नॉमिनेशन सुविधा सर्व खातेदारांसाठी लागू आहे. ई-नॉमिनेशनचे संपूर्ण काम डिजिटल पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यालयात जाण्याचीही खातेधारकांना गरज नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईपीएफओनं ई-नॉमिनेशन करण्याची संपूर्ण पद्धतही सांगितली आहे.

कसं फाइल कराल e-nomination१. सर्वप्रथम तुम्हाला epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.२. यातील सर्व्हीस टॅबवर क्लिक करा आणि The employees ऑप्शनवर क्लिक करा.३. यानंतर Member UAN/Online Service या ऑप्शनवर क्लिक करा.४. पुढे e-Sewa Portal वर जाऊन सर्व आवश्यक माहिती नमूद करा५. येथे तुम्हाला मॅनेजर टॅब दिसेल यात तुम्हाला YES पर्याय निवडावा लागेल आणि फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करावे लागेल. ६. आपल्या कुटुंबीयांची सर्व माहिती नमूद करा.७. आता Nomination Details वर क्लिक करा आणि शेअरिंग टक्केवारीची माहिती भरा८. यानंतर ईपीएफ नॉमिनेशन डिटेल्स save करायला विसरू नका.९. E-Sign पर्याय निवडा आणि ओटीपी जनरेट करा१०. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी OTP नमूद करा.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्राहकाचे ई-नॉमिनेशन पूर्ण होते. जर ग्राहकाने ई-नॉमिनेशन केले नाही, तर त्याच्या नॉमिनीला सामाजिक सुरक्षेशी संबंधित लाभ मिळण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. हे टाळण्यासाठी ई-नॉमिनेशन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. खातेदाराचा मृत्यू झाल्यावर ई-नॉमिनेशनचा लाभ नॉमिनीला मिळतो. अशा परिस्थितीत ई-नॉमिनेशन नोंदणी केल्यास नॉमिनीला ७ लाख रुपये दिले जातात. ग्राहकाने नॉमिनीचे नाव नमूद करणे आवश्यक आहे, यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. ग्राहक घरबसल्या त्यांच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरुन ई-नॉमिनेशन दाखल करू शकतात. ईपीएफओ सदस्य वरील स्टेप्सचं पालन करून सहजपणे ई-नॉमिनेशन करू शकतात.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीbusinessव्यवसाय