शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

EPFOच्या ६.५ कोटी सदस्यांना केंद्र सरकार देणार होळीची खास भेट, १२ मार्चपासून वाढू शकतो व्याजदर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 3:57 PM

EPFO Interest Rate News: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबत सरकार ईपीएफओच्या सदस्यांना होळीची भेट देण्याची शक्यता आहे. सरकार पीएफवरील व्याज दरांमध्ये वाढ करू शकते.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबत सरकार ईपीएफओच्या सदस्यांना होळीची भेट देण्याची शक्यता आहे. सरकार पीएफवरील व्याज दरांमध्ये वाढ करू शकते. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक १२ मार्च २०२२ रोजी गुवाहाटीमध्ये होणार आहे. यामध्ये व्याजदरांवर चर्चा होईल.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीमध्ये सध्याच्या आर्थिक वर्षासाठी व्याज निश्चित केले जाईल. त्यानंतर ते आपल्या शिफारशी केंद्रीय वित्त मंत्रालयाला करतील. तिथे व्याजदरांवर अंतिम मोहोर उमटवली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीटीचे काही सदस्य व्याजदर वाढवण्याच्या मताचे आहेत. चालू आर्थिक वर्ष ईपीएफओसाठी आव्हानात्मक ठरले आहे. तरीही ८.५ टक्के व्याज देण्यासाठी ईपीएफओ आपल्या इक्विटी गुंतवणुकीमधील हिस्सेदारी विकू शकते. पर्याय कमी असल्याच्या कारणाने बॉण्ड गुंतवणूक अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. तसेच जमलेल्या रकमेची गुंतवणूक होऊ होऊ शकलेली नाही. ईपीएफओ इक्विटीसोबत डेटमध्ये गुंतवणूक करतात. ईपीएफओच्या फायनान्स इन्व्हेस्टमेंट आणि ऑडिट कमिटीने आपल्या शिफारशी सीबीटीला पाठवल्या आहेत.

ईपीएफओने २०२०-२१मध्ये आपल्या सब्स्क्रायबर्सना ८.५ टक्के व्याज दिले होते. सर्वाधिक व्याजदर २०१५-१६ मध्ये मिळाले होते. त्यावेळी ८.८ टक्के व्याजदर दिला गेला होता. आता पगारदार वर्गाचे लक्ष हे १२ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीवर असेल. यामध्ये चालू आर्थिक वर्षासाठीच्या व्याजदराची घोषणा होणार आहे. केंद्रीय कामगार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महत्त्वाच्या बैठकीत व्याजदरांच्या निर्णयाचा प्रस्ताव सूचिबद्ध आहे.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, ईपीएफओचे व्याजदर वाढवण्याचा किंवा त्यांना स्थिर ठेवण्याबाबचा निर्णय पुढील आर्थिक वर्षांतील उत्पन्नावर घेतला जाईल. त्याचा अंतिम निर्णय बोर्ड करेल. अशा परिस्थितीत बोर्डाच्या मिटींगची चर्चा झाल्यानंतरच याबाबतचा कुठलाही निर्णय होईल. आमचा हेतू हा सामान्य लोकांना दिलासा देण्याचा आहे. त्यासाठी सर्व उपाय केले जातील.  

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीMONEYपैसाCentral Governmentकेंद्र सरकार