शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

'पेन्शन'चं आता 'नो टेन्शन'!, EPFO ने सुरू केली नवी योजना; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 9:35 AM

पेन्शनधारकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी 'ईपीएफओ'ने (EPFO) पुढाकार घेतला आहे.

नवी दिल्ली-

पेन्शनधारकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी 'ईपीएफओ'ने (EPFO) पुढाकार घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत घेतलेल्या पुढाकाराअंतर्गत ईपीएफओकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही नवीन सुविधा दिल्या जात आहेत. 'ईपीएफओ'ने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत रद्द केली आहे. तर आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच 'पेन्शन पेमेंट ऑर्डर' देण्याची व्यवस्था देखील केली आहे.

EPFO नं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. "EPFO ​​द्वारे 'अखंड सेवा': सदस्य निवृत्तीच्या दिवशी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) मिळवू शकतील. सर्व प्रादेशिक कार्यालयं 'सेवानिवृत्तीच्या दिवशी पीपीओ जारी करण्यासाठी प्रयत्न' या शीर्षकानं मासिक वेबिनार आयोजित करत आहेत. तीन महिन्यांच्या आत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियोक्त्यांसोबत वेबिनारमध्ये मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले जात आहे. या उपक्रमाचा लाभ दरवर्षी निवृत्त होणाऱ्या सुमारे ३ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे", असं ट्विट EPFO नं केलं आहे. 

केव्हाही जमा करता येणार लाइफ सर्टिफिकेटयापूर्वी, ईपीएफओनं सांगितलं होतं की आता पेन्शनधारक संपूर्ण वर्षात कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जे पुढील एक वर्षासाठी वैध असेल. निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतं. असं करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचं पेन्शन थांबवलं जाण्याचा धोका असतो. EPFO च्या मते, EPS 95 चे निवृत्तीवेतनधारक कोणत्याही मुदतीशिवाय वर्षातून कधीही त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. हे प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षासाठी वैध असेल. म्हणजेच, जर एखाद्या पेन्शनधारकाने १५ एप्रिल २०२२ रोजी त्याचे जीवन प्रमाणपत्र सादर केले, तर पुढील वेळी त्याला १५ एप्रिल २०२३ पूर्वी कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करता येऊ शकतं.

खासगी क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांना दिलासाEPS 95 च्या या योजनेच्या कक्षेत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो. EPFO ने डिसेंबर 2019 मध्ये अशा कर्मचार्‍यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे नियम बदलले होते. यासह, ईपीएफओने दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन दूर केले आणि लाभार्थ्यांना ते वर्षभरात कधीही सादर करण्याची सवलत दिली. ईपीएफओच्या या नव्या उपक्रमामुळे त्याला खासगी क्षेत्रात काम करण्याची परवानगी मिळाली आहे. EPFO च्या या नव्या उपक्रमामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीProvident Fundभविष्य निर्वाह निधी