नवी दिल्ली - कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) ने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी २४.०७ कोटी व्यक्तींच्या खात्यामध्ये ८.५० टक्के दराने व्याज जमा केले आहे. ईपीएफओने अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगितले की, आतापर्यंत २४.०७ कोटी लोकांच्या खात्यामध्ये २०२०-२१ या वर्षासाठी ८.५० टक्के दराने पैसे जमा करण्यात आले आहेत. तुमच्या खात्यामध्ये पीएफचे व्याज जमा झाले आहे की, नाही हे तुम्ही त्वरित या पद्धतीने जाणून घेऊ शकता.
एसएमएसच्या माध्यमातून बॅलन्स जाणून घेण्यासाठी ईपीएफओचा रजिस्टर मोबाईल नंबर 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवून तुम्ही बॅलन्स जाणून घेऊ शकता. LAN चा अर्थ भाषा असा आहे. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असेल तर LAN च्या जागी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN लिहावे लागेल. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी EPFO UAN HIN लिहून मेसेज लिहून पाठवावा लागेल.
तसेच तुम्ही एखा मिसकॉलच्या माध्यमातूनही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ०११ २२९०१४०६ वर मिसकॉल देऊन बॅलन्स जाणून घेऊ शकता. त्याबरोबरच तुम्ही तुमचा बॅलन्स ऑनलाइन जाणून घेण्यासाठी ईपीएफ पासबूक पोर्टलवर भेट देऊ शकता. या पोर्टलवर तुम्ही तुमचा UAN आणि पासवर्डच्या माध्यमातून ल़ॉगइन करा. त्यामध्ये Download/View Passbook वर क्लिक करा आणि नंतर तुमच्यासमोर पासबूक उघडेल, ज्यामध्ये तुम्ही अकाऊंट बॅलन्स पाहू शकता.
तसेच जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही या अॅपच्या माध्यमातून जेव्हा वाटेल तेव्हा ईपीएफ बॅलन्स पाहू शकता. त्यासाठी उमंग अॅप उघडून या अॅपमध्ये EPFO वर क्लिक करा. त्यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा. त्यानंतर View Passbook वर क्लिक करून UAN आणि पासवर्ड टाका. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो टाईप केल्यावर EPF बॅलन्स दिसेल.