शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

समान नागरी कायदा सहमतीशिवाय नाही - नायडू

By admin | Published: October 27, 2016 2:42 AM

समान नागरी कायदा मागच्या दाराने आणणार नाही आणि सर्वहमती झाल्याशिवाय तो येणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकया

नवी दिल्ली : समान नागरी कायदा मागच्या दाराने आणणार नाही आणि सर्वहमती झाल्याशिवाय तो येणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकया नायडू यांनी केले. वादग्रस्त विषय भाजप निवडणुकांमध्ये (विशेषत: उत्तर प्रदेश) मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी उपस्थित करीत असल्याचा आरोप नायडू यांनी फेटाळला. तीनवेळा तलाक, समान नागरी कायदा आणि राम मंदिर या विषयांचा वापर भाजप आगामी निवडणुकांमध्ये लाभासाठी करणार नाही तर निवडणुका विकासाच्या कार्यक्रमावर लढवू, असे नायडू म्हणाले. असे महत्वाचे विषय हे निवडणुकीतील फायद्यांच्या चष्म्यातून बघितले जाऊ नयेत, असे सांगून नायडू यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राइक्सला राजकीय रंग दिल्या गेल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळला. तीन वेळा तलाक हा विषय सरकार धार्मिक समजत नाही तर तो लिंग समानतेचा आहे. आम्ही मुस्लिमांच्या प्रश्नांत ढवळाढवळ करीत आहोत, असे म्हणणे चूक आहे. भारतीय संसदेने व राजकीय व्यवस्थेने हिंदू संहिता विधेयक (कोड बिल), घटस्फोट कायदा, हिंदू विवाह कायद्यावर बंदी, हुंड्यावर बंदी, सती प्रथेवर बंदी विधेयके संमत केली, असे त्यांनी म्हटले. समान नागरी कायदा आणण्यासाठी व्यापक एकमताची गरज आहे. समान नागरी कायद्याबाबत विधी आयोगाने प्रश्नावली लोकांनी मते सांगावीत म्हणून जारी केल्याचे नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)पाक कलाकारांवर बंदी नाही... पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास सरकारने बंदी घातलेली नाही, परंतु त्यांना कामे देताना चित्रपट निर्मात्यांनी लोकभावनेचा आदर ठेवला पाहिजे, असे नायडू म्हणाले. भारतात इतर देशांतील कलाकारांना काम करण्यास बंदी घालण्याविरोधात मी आहे. परंतु शेजारच्या देशाकडून छुपे युद्ध सुरू असल्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी ही परिस्थितीही लक्षात घेतली पाहिजे, असे व्यंकया नायडू म्हणाले.